धर्माबाद (अहमद लड्डा)
राज्यातील महाविकास आघाडी शासनाच्या जुलमी धोरणामुळे राज्यातील जनता, शेतकरी व व्यापारी हैराण झाले आहेत.तसेच कोरोनाच्या काळातील वाढीव वीजभील वसुल करण्यासाठी महावितरण कंपनी संबधित ग्राहकांचे वीज जोडणी तोडत असल्यामुळे सदरील जुलमी धोरणाचा भाजपाने निषेध करून शुक्रवारी शहरातील पानसरे चौकात व महावितरणच्या कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करून महावितरण कंपनीच्या कार्यालयास कुलूप लावून आक्रमक झाले होते.तसेच उपविभागीय अभियंता सुमित पांडे यांना यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
महावितरण कंपनीच्या व महाविकास आघाडीच्या जुलमी धोरणाच्या विरोधात भाजपाने हल्लाबोल व ताळे ठोको आंदोलन पुकारला असून त्याच पार्श्वभूमीवर धर्माबाद येथील भाजपाच्या वतीने हल्लाबोल व ताळे ठोको आंदोलन करण्यात आले आहे.शहरातील पानसरे चौकात व महावितरणच्या कार्यालयासमोर शुक्रवारी भाजपाच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करून महावितरण कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोकले होते. तसेच कोरोनाच्या काळातील वाढीव वीजभील महावितरण कंपनीने वसुल करण्याची मोहीम हाती घेतली आहे.सदरील वसुली मोहीम व वीज जोडणी खंडीत करण्याचे प्रकार तात्काळ थांबवावे अनथा भाजपाच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांस देण्यात आले आहे. तसेच सदरील मागण्यांचे निवेदन तहसिलदार शिंदे व पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांना देण्यात आले आहे.यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पोतगंटीवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष रामचंद्र पाटील बन्नाळीकर यांच्या नेतृत्वाखाली सदरील हल्लाबोल आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी भाजपाचे नगरसेवक संजय पवार, साईनाथ शिरपुरे , संजय पाटील शेळगावकर, संचालक शामसुंदर झंवर, विठ्ठलराव पाटील चोळाखेकर, अंकित गोधा, अमित मुंदडा ,श्रीनिवास ईनानी, हनुमंत पाटील मोकलीकर, नारायण पाटील रामपूरकर, साईनाथ स्वामी, चैतन्य घाटे, ललेश पाटील मंगनाळीकर , आवार नारायण ,शंकर तुनकेवार, तुकाराम पाटील,हणमंत कत्ते , यलप्पा आकुलवार यांच्यासह
भाजपाचे पादाधिकरी, लोकप्रतिनिधी व मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS