जारीकोट येथील "प्रशासन आपल्या गावी" या उपक्रमात आमदार राजेश पवार यांनी सोडवल्या तात्काळ जनतेच्या अडचणी

धर्माबाद (अहमद लड्डा )  माननीय जिल्हाधिकारी विपीन इटकर यांच्या संकल्पनेतून प्रशासन आपल्या गावी या जनतेच्या व प्रशासनाच्या सुसंवादासाठी आयो...


धर्माबाद (अहमद लड्डा) 

माननीय जिल्हाधिकारी विपीन इटकर यांच्या संकल्पनेतून प्रशासन आपल्या गावी या जनतेच्या व प्रशासनाच्या सुसंवादासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमातून शासकीय कामासाठी होणारा विलंब आणि सामान्य नागरिकांची होणारी हाल यातून मुक्तता व्हावी ही संकल्पना जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी हा उपक्रम राबविण्याचे आदेश दिले होते .

याच अनुषंगाने काल जारीकोट तालुका धर्माबाद येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेश पवार हे होते जारिकोट महसुल सज्जा अंतर्गत येणाऱ्या गावातील अनेक नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन या ठिकाणी आले असताना आमदार राजेश पवार यांनी तात्काळ त्या ठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांना जनतेची कामे वेळेवर आणि फक्त प्रशासन आपल्या दारी या कार्यक्रमातच नव्हे तर कायमच जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्परता दाखवण्याचे आदेश दिले

संबंधित ग्रामसेवक आणि तलाठी यांच्याशी निगडित असणाऱ्या समस्या अनेक असून विद्युत वितरण कंपनीच्या ही अनेक समस्यांचा सोक्षमोक्ष राजेश पवार यांनी तात्काळ त्या ठिकाणी प्रशासन आपल्या गावी या कार्यक्रमातच लावला.

निराधार महिलांचे प्रश्न घरकुलांच्या योजना बँकेत कर्जमाफीत न झालेले शेतकऱ्यांच्या समस्या आणि अशा अनेक प्रश्नावर संबंधीतानी आपली कागदपत्रे घेऊन या कार्यक्रमाला उपस्थित झाली होती .

 सर्वप्रथम तालुक्याचे तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी या कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली व जनतेची शासकीय कार्यालयामध्ये होणारी हाल आता यापुढे होणार नाहीत व तात्काळ त्यांना संबंधित कागदपत्रे वितरित केले जातील प्रमाणपत्रे वितरित केली जातील अशी हमी या कार्यक्रमात श्री तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी दिली.

 आमदार राजेश पवार यांनी प्रशासन आपल्या गावी हा अत्यंत उपयुक्त व स्तुत्य असून जनसामान्यला याचा निश्चितच फायदा होईल आणि त्याच माध्यमातून आज या ठिकाणी जवळचा जवळपास तब्बल पाच ते सहा तास चाललेल्या कार्यक्रमात राजेश पवार व्यासपीठावरून एकदाही खाली उतरले नाहीत.

 तर जनसामान्यांच्या प्रत्येक माणसाच्या शेवटचे काम होईपर्यंत मी या ठिकाणाहून जाणार नाही असे त्यांनी व्यासपीठावरून सांगितले . संबंधित अधिकाऱ्याला बोलवून निराधार निराश्रित लोकांचे प्रश्न त्यांच्या समस्या ह्या सोडवण्याची नायगाव विधानसभा मतदार संघात पहिलीच वेळ होती हा उपक्रम जनतेला अत्यंत आवडला असून मतदार संघातील सर्व महसूल मध्ये हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे ही आमदार राजेश पवार यांनी सांगितले.

 या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद्माताई सतपलवार तालुक्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार दत्तात्रय शिंदे ,गटविकास अधिकारी बळदे, तालुका पुरवठा अधिकारी आनंदेसवार जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय रेड्डी धर्माबाद तालुका पंचायत समिती सभापती मारुती कागेरू विद्युत महावितरण चे सुमित पांडे विविध ग्रामीण बँकेचे चे शाखाधिकारी आपापल्या कर्मचाऱ्यासह याठिकाणी उपस्थित होते.

 आमदार राजेश पवार हे तात्काळ जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष देत होते मतदारसंघात पहिल्यांदाच होत असलेल्या कार्यक्रमाबद्दल जिल्हाधिकारी व आमदार राजेश पवार यांचे जनतेने आभार मानले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group