सहारा काँलनी मधील महीलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद शंभर वृक्ष वाटप


धर्माबाद (अहमद लड्डा

शहरातील सहारा काँलनी येथील महीलांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही मकरसंक्रांत निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी आयोजित केला होता.सदरील कार्यक्रमास शहरातील महीलांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे.सौ रेणुका रघुवीर चौव्हान यांच्या कडून शंभर महीलांना वृक्ष भेट वाण मणून दिले यावेळी शेकडो महीलांना ब्लाऊज पिस घालून वटी भरण्यात आल्यामुळे सदरील हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची चर्चा शहरात होत आहे.


शहरातील सहारा काँलनी येथील सर्व महीला एकत्र येऊन दर वर्षी मकरसंक्रांत निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजाला एक नवा संदेश देण्याच्या प्रयत्नात असतात त्यामुळे सहारा काँलनी येथील महीलांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकवाच्या व वृक्ष भेटीचा कार्यक्रमाची चर्चा शहरातील महीला वर्गात सुरूच असते.विशेष असेकी सहारा काँलनी मध्ये सर्व जाती धर्माचे लोक वास्तव्यास आहेत.परंतु आज पर्यत सहारा काँलनी येथील महीला कुठलाही जातीचा भेदभाव न करता दरवर्षी सर्व महीला एकत्र येऊन विविध सामाजिक उपक्रम राबवित असल्यामुळे त्यांच्या सामाजिक उपक्रमांची चर्चा होत आहे.तसेच आयोजित केलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास शहरातील शेकडो महीलांनी हजेरी लावली होती.आलेल्या महीलांना वाण व वृक्ष देऊन त्यांच्यासाठी उत्तम अल्पोपहारा मध्ये दही धपाटे ची व्यवस्था करण्यात आली होती.सदरील हळदी कुंकवाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ रेणूका रघुवीर चौव्हान .पुढाकार घेऊन सोबत.जोती साईनाथ वारले.रिधी सिद्धी मुळे. किरण चौव्हान. शिरगिरे मँडम.रोजा गाजेवार.शुभांगी चौव्हान.मीना ठाकूर.सौ पुष्पाताई वाघमारे. व सहारा काँलनीतील महीला यांनी परीश्रम घेतले आहे.

टिप्पण्या
Popular posts
उमरी तालुक्यातील बोरजूनी येथे प्रेम प्रकरणातून प्रियकर व मुलींची वडिलांकडून हत्या
इमेज
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या विजयी उमेदवारांना दिल्या शुभेच्छा*
इमेज
वि. स. पागे:रोजगार हमी योजनेचे जनक* भारतातील रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि. स .पागे यांची २१ जुलै रोजी जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा हा गौरवास्पद आलेख ..
इमेज
डाॅ.लोपामुद्रा,आपण महाराष्ट्र पोलीस दलाचीच नव्हे तर भारतीय पोलीस दलाची "डाॅ.विजश्री लोपामुद्रा" आहात!...डाॅ.हंसराज वैद्य...*
इमेज
उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्या बदल नूतन विद्यालय क्रीडा विभाग व खेळाडू च्या वतीने सत्कार
इमेज