नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार)
तालुक्यातील रानसुगाव येथील ग्रामपंचायतीवर ग्राम विकास एकता पॅनलने आपले वर्चस्व कायम ठेवत सरपंचपदी गोविंद संग्रपवार तर उप सरपंचपदी सौ. नंदाबाई विलासराव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
एकूण सात सदस्य असलेल्या रानसुगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ग्राम विकास एकता पॅनलचे पाच उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांमध्ये सौ.नंदाबाई विलासराव जाधव, गोविंद लक्ष्मणराव संग्रपवार, सौ. रेखा कैलाश जाधव सौ. प्रीती सिद्धार्थ हणमंते, बालाजी सर्जेराव जंगले हे उमेदवार विजयी झाले काल झालेल्या सरपंच निवडीच्या बैठकीत सरपंचपदी गोविंदराव लक्ष्मणराव संग्रपवार यांची निवड झाली तर उप सरपंचपदी सौ. नंदाबाई विलासराव जाधव यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी कानोडे होते.
यावेळी व्यंकटराव दिगांबर जाधव, संजय नारायण जाधव, श्रीहरी सोनबा जाधव, बळीराम श्रावण हणमंते, दिलीप बळीराम जाधव, उद्धव कोंड्जी जाधव, चंद्रकांत विठ्ठल जाधव, रामराव दिगांबर जाधव, बापूराव जाधव, तिरुपती व्यंकटराव जाधव, महारुद्र अशोक जाधव, प्रकाश जळबा जाधव, बालाजी पांडुरंग जाधव, शिवाजी आनंदा जंगले, गौतम किशन हणमंते, शंकर संभाजी जाधव, वसंत उद्धव जाधव, गजानन उत्तम जाधव, रावसाहेब वामन हणमंते, शिवानंद लक्ष्मण जाधव राजीव जनार्धन जाधव रामकिशन भगवान जाधव आदिंची उपस्थिती होती.

COMMENTS