नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
येथील शरदचंद्र महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.डी. इंगळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिवादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.बी.डी. इंगळे हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रोफेसर डॉ. बलभीम वाघमारे ( सांस्कृतिक विभागप्रमूख)होते. यावेळी डॉ. वाघमारे म्हणाले की, सध्याच्या तुलनेमध्ये शिवाजी राज्याच्या काळात खरी लोकशाही होती. त्यांच्या राज्यामध्ये सर्व धर्म व जातीना समान संधी व समान न्याय होता पण आज देशामध्ये आदर्श लोकशाही व राज्यघटना असतानाही समान संधी व न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे. यासाठी बहुजनांनी आत्मचिंतन करून लढयासाठी सज्ज होणे काळाची गरज आहे. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य बी.डी. इंगळे म्हणाले की, शिवाजी राजेंना मुस्लिमविरोधी आहेत असा अपप्रचार करण्यात आला पण शिवाजी राजांनी अनेक महत्वाच्या पदावर मुस्लिम व्यक्तिची अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे कारण शिवाजी राजे हे . समतेचे पुरस्कृते होते म्हणूनच त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना मावळे असा शब्द वापरलेला आहे. यावेळी प्रोफेसर डॉ. बालासाहेब ढेंबरे, प्रोफेसर डॉ. दादाराव पानपट्टे, डॉ.एन.पी. सानप, डॉ.एम.एस. सिद्की, प्रोफेसर डॉ. नांगरे, प्रोफेसर प्रा.डॉ. शंकर गड्मवार डॉ. वट्टमवार,. प्रा.डॉ. कुळकर्णी, प्रा.सौ. पांगरकर, , संदिप बकवाड, शिवाजी मोहिते, बालाजी काळे, बाबूराव पुट्टेवाड, व्ही.डी. भालेराव, प्रशांत मोरे, आशिष गडदे, बालाजी कावडे, देवीदास भाकरे इ कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार ग्रंथपाल.डॉ. बी.आर लोकलवार यांनी मानले.

COMMENTS