नायगाव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार )
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नायगांव येथे पुर्वी ग्राहकांच्या मनात रूजलेले व सध्या नांदेड येथे कार्यरत असलेले मुख्य व्यवस्थापक पी.रविकुमार यांचा गोवा येथे एका विशेष कार्यक्रमात 'महारत्न' पुरस्काराने सन्मान पञ देऊन गौरविण्यात आले.
दि.२० फेब्रुवारी २०२१ रोजी गोवा येथे एसबीआयच्या वतीने जीवन व्यवसायासाठी महाराष्ट्रातील मुख्य सरव्यवस्थापकांचा सत्कारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याच कार्यक्रमात नांदेड येथे कार्यरत असलेले एसबीआयचे मुख्य व्यवस्थापक पी.रविकुमार यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सर्कलचे चीफ जनरल मॅनेजर दीपक लल्ला सर यांच्या हस्ते 'महारत्न' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी महाव्यवस्थापक श्री.बलदेव प्रकाश सर,उपमहाव्यवस्थापक श्री.रविकुनार वर्मा आणि क्षेत्रीय व्यवस्थापक उमेश ढाके सर यांची विशेष उपस्थिती होती पी.रविकुमार सर यांना महारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल नायगांव येथील पञकार माधव बैलकवाड.शेख आरिफ.रामप्रसाद चन्नावार.साहेबराव धसाङे अनिल कांबळे.श्याम गायकवाड. मोहण श्रीरामे. शंकर अङकिणे.माधव धङेकर. ईत्यादीनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS