नांदेड,
मुसलमानवाडी (पाटी) ता. जि. नांदेड येथील वसंत हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दि. 1 फेब्रुवारी 2021 रोजी शिक्षण क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व, सेवानिवृत्त प्राध्यापक मुकुंद बोकारे यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम शाळेचे प्राचार्य सतीश बी. चव्हाण यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला. यावेळी इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात श्री मुकुंद बोकारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्री.मुकुंद बोकारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना श्री मुकुंद बोकारे यांनी आजची परिस्थिती, आजचा युवक, आजचा विद्यार्थी उच्च पातळीवर पोहोचण्यासाठी जात, धर्म,गरिबी -श्रीमंती कुठेही अडसर ठरत नसल्याचे सांगून यशाला शॉर्टकट नसतो त्यासाठी जिद्द व कष्ट करण्याची तयारी असेल तर यश नक्कीच खेचून आणता येईल असे सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा समुपदेशक श्री बालासाहेब कच्छवे यांनी इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना महाकरियर पोर्टल बाबतीत सविस्तर असे मार्गदर्शन केले. त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या समस्या, अभ्यास कसा करावा?, पुढील काळात कोणत्या क्षेत्राकडे वळावे यासह विविध विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. सत्कारमूर्ती प्रा. मुकुंद बोकारे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेज शेकापुर ता.कंधार चे प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.शेवटी उपस्थितांचे आभार *प्राचार्य सतीश बी.चव्हाण* यांनी मानले.

COMMENTS