*अनंत जाधव /बीड -वडवणी तालुक्यातील मोरवड येथे शाक्यराजे फिल्म्स प्रोडक्शनच्या वतीने गांव तिथं गावकी, भाव तिथं भावकी* या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरूवात दिनांक २७ जानेवारी बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मस्साजोग येथे करण्यात आली. यावेळी चित्रपटाचे चित्रीकरण पाहाण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. व ज्यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली अशा विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या चित्रपटाचे दिग्दर्शक व लेखक सिध्दार्थ सोनवणे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. व मोरवड येथे गाव तिथं गावकी ,भाव तिथं भावकी या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण दिनांक 31जानेवारी रविवार रोजी सुरूवात करण्यात आली यावेळी उपस्थित या चित्रपटाच्या निर्मात्या अॅड शुभांगी मोरे पाटील, मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख, बिभिषण अण्णा सोनवणे, चांडाळ चौकडीच्या करामती वेबसिरीजचे कलाकार रामभाऊ जगताप, विष्णू भारती (पाटील) गाव लय गॉड वेबसिरीजचे कलाकार महादेव सवाई, माझ्या नवऱ्याची बायको,गोठ या मराठी मालिके मधील कलाकार सुनील मळेकर , कलाकार महेश कुमार,व इतर कलाकार-अमोल राठोड, भावना काळे,प्रमीला जगताप,अमरज्योती
जावळे,सुरेखा डोंगरदीवे, उषा चव्हाण, लुंबिनी सरवदे , शंभूराजे, प्रिन्स प्रोडक्शन डिओपी अनुप गजानन वाकोडे, सहाय्यक दिग्दर्शक अभिजित मानके,डि,ए सैरभ इंगळे , डी ए रोशन मा. इंगळे ,लाईट मन रोशन इंगळे, प्रसिद्ध प्रमुख अनंत जाधव,अशोक उंदरे, रंगभूषा रणजीत सुर्यवंशी, सहाय्यक रंगभुषा पंकज काशिद व इतरकलाकारांच्या व वडवणी तालुक्यातील मोरवड येथील सरपंच सरस्वती ज्ञानोबा लंबाटे, राजेभाऊ सिंपले, गोविंद शेंडगे, माजी सरपंच महादेव शेंडगे, युवा नेते महादेव बप्पा शेळके, नवनाथ लंबाटे, महेश्वर कटारे, कल्याण (बापु) शेळके, महादेव (जिजा) शेळके व मोरवड येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. मोरवड येथे चित्रपटाचे चित्रीकरणाचा दुसरा दिवस असुन चित्रपटाचे चित्रीकरण 27 जानेवारी बुधवार रोजी सुरूवात करण्यात आली.

COMMENTS