केज प्रतिनिधी.
केज तालुक्यातील ठिबक व तुषारचे थकीत अनुदान तात्काळ अदा करण्यात यावे या मागणीसाठी ताळेठोक आंदोलनाच्या इशाऱ्यास काही प्रमाणात यश आले असून संभाजी ब्रिगेड च्या वतीने आंदोलनाचा इशारा देताच कृषी कार्यालयास जाग आली आणि त्यांनि प्रलंबित राहिलेल्या प्रस्तावांपैकी 1674 प्रस्ताव निकाली काढले असून उर्वरीत 295 प्रस्ताव देययक रक्कम मागणी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठवली आहे असे लेखी दिल्यामुळे आज होणारे टाळे ठोक आंदोलन तूर्तास स्थगित करून येत्या काळात लवकरात लवकर उर्वरीत प्रस्ताव निकाली काढावेत अन्यथा पुनः आंदोलन करू असे निवेदन यावेळी तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदनावर व्ही,बी, व्ही, पी जिल्हाध्यक्ष योगेश अंबाड,संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष राहुल खोडसे,तालुका सचिव रामराजे गलांडे, शरद खोडसे,अभिषेक भिसे,राहुल ठोंबरे, श्रीपाद डोके आदींच्या स्वाक्षरी आहेत

COMMENTS