---------------------------------------------------------------------बीड : बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांचा वाढदिवस दिनांक 17 फेब्रुवारी रोजी जिल्हा भरात अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला .या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा उषाताई रमाकांत मुंडे यांच्या वतीने दिनांक 17 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या कन्या रत्नांचा साडी-चोळी व बेबी किट देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना प्रा. देविदास नागरगोजे यांनी महिला आघाडीच्या या उपक्रमा बद्दल महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले तर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उषा काकूमुंडे यांनी प्रीतमताई मुंडे या आपल्या जिल्ह्याच्या नुसत्या खासदार नसून त्या बीड जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या ,रंजल्या गांजलेल्या लोकांच्या आधार आहेत असे विचार व्यक्त केले . याप्रसंगी रमाकांत बापू मुंडे व संगीताताई धसे यांनीदेखील मार्गदर्शन उपस्थितांना केले . बीड येथील शासकीय रुग्णालय व केज उपजिल्हा रुग्णालय येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे नेते रमाकांत मुंडे, संघटन सरचिटणीस प्रा . देविदास नागरगोजे ,जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत हजारी, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ वासुदेव नेहरकर ,कृष्णा तिडके महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उषाताई मुंडे, ऍड . संगीताताई धसे, संध्याताई राजपूत छायाताई मिसाळ ,संजीवनी ताई राऊत डॉ अरुणा नेहरकर ,सौ जयश्री नेहरकर ,यांच्या हस्ते काल जन्मलेल्या बाळासाठी बेबी किट व आईसाठी साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला . खासदार प्रीतम ताई मुंडे यांच्या वाढदिवसा दिवशी जन्मलेल्या कन्यारत्न साठी स्वेटर , ड्रेस ,पावडर व लहान बाळाच्या उपयुक्त साहित्याचे किट तयार करून वाटप करण्यात आले तर आईसाठी साडीचोळी देऊन व फेटा बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व मातांनी आपल्या जिल्ह्याच्या लाडक्या खासदार डॉ. प्रीतम ताई मुंडे यांना दीर्घायुष्य सुखसमृद्धी व यश मिळावे असा आशीर्वाद देण्याचे आव्हान सर्व पदाधिकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी सुरेश पवार व त्याच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले . प्रा. देविदास नागरगोजे बीड
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
यंदा आपल्या वयाचा अमृतमहोत्सव साजरा करत असलेले प्रा. विश्वास वसेकर हे समकालातील एक महत्त्वाचे ललितलेखक, कवी, संपादक, समीक्षक आणि अनुवादक आहे...
-
कु. समृद्धी पौर्णिमा राजेंद्र केरकर ही गोव्यातील एक गुणी आणि समृद्ध अशी लेखिका-कवयित्री आहे. यापूर्वी तिची 'निर्झर', 'अप्रूप वसु...
-
नरेंद्र येरावार उमरी प्रतिनिधी सध्याचे युग हे स्पर्धेचे आणि भौतिक सुखाच्या मागे धावण्याचे युग आहे. माणूस पैसा, पद, प्रतिष्ठा मिळवण्यात व...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
यंदा आपल्या वयाचा अमृतमहोत्सव साजरा करत असलेले प्रा. विश्वास वसेकर हे समकालातील एक महत्त्वाचे ललितलेखक, कवी, संपादक, समीक्षक आणि अनुवादक आहे...
-
कु. समृद्धी पौर्णिमा राजेंद्र केरकर ही गोव्यातील एक गुणी आणि समृद्ध अशी लेखिका-कवयित्री आहे. यापूर्वी तिची 'निर्झर', 'अप्रूप वसु...
-
नरेंद्र येरावार उमरी प्रतिनिधी सध्याचे युग हे स्पर्धेचे आणि भौतिक सुखाच्या मागे धावण्याचे युग आहे. माणूस पैसा, पद, प्रतिष्ठा मिळवण्यात व...
-
नांदेडमध्ये शेतकरी आक्रमक; कागदी पाहणी अन् कोरड्या बैठका बंद करून थेट मदत देण्याची मागणी अर्धापूर/नांदेड : गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पावस...
-
केशव पवार लोहा, तालुक्यातील पोखरी येथे कापसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमली पदार्थविरोधी पथक आ...

COMMENTS