केज /प्रतिनिधी .केज तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असुन हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावुन घेतला आहे. याबाबत केजच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी केज तालुक्यातील सारूळ, जोला, पिंपळगाव, विडा या गावातील
गुरूवारी मध्यरात्री अचानक झालेल्या अवकाळी पावसाने हरभरा,गहू, ज्वारी,आंबे,टरबूज, खरबूज,डाळिंब,फळबाग व भाजीपाल्यांचे अतोनात नुकसान झाले. यावळी आ.नमिताताई मुंदडा यांनी कृषी मंञी दादाजी भुसे साहेब यांना फोनवर तात्काळ ऑफ लाईन पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी विनंती केली. याप्रसंगी पाहणी अक्षय भैय्या मुंदडा, केज तहसीलदार मेंडके ,तालुका कृषी अधिकरी भगत ,भाजपा तालुका अध्यक्ष भगवान केदार ,
विडा गटाचे जि.प.सदस्य विजयकांत मुंडे,सुनिल आबा गलांडे, रमाकांत बापु मुंडे,मुरलीधर ढाकणे, सुरज पटाईत, सुनिल घोळवे, मच्छिंद्र जोगदंड, शिवाजी पाटील,राहुल गदळे, सुदाम पाटील,फरके अण्णा , काकासाहेब पाळवदे, धनराज पवार, सरपंच केशव घोळवे, सारूळ सरपंच संभाजी ढाकणे, शंकर ढाकणे, पञकार दत्ता ढाकणे, आशोक गायकवाड, सुरेश घोळवे, रवी नांदे, उध्दव देशमुख, डॉ. ढाकणे साहेब, सदाशिव वाघमारे, बाबा शेख, आशोक गायकवाड, यापाहाणीत शेतकरी बबन ढाकणे, सहदेव घोळवे, उध्दव घोळवे,भाऊसाहेब ढाकणे, श्रीकांत सारूक, फुलचंद सारूक, कृष्णा सारूक यांच्या शेतातील पाहाणी केली.
संबधित प्रशासकीय अधिकारी ,मंडळ आधिकारी, तलाठी,कृषी साहाय्यक हे दौऱ्याच्या दरम्यान उपस्थित होते.यावेळी शेतकर्यांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत .

COMMENTS