* बोलता बोलता,१ वर्ष झालं !*🙋♀️ एक वर्ष होतंय आपल्या निवृत्तीला. खरं तर गेल्या आठवड्यापासूनच गेल्या वर्षीची रिटायरमेंटची लगबग आठवत होती....
*
बोलता बोलता,१ वर्ष झालं !*🙋♀️ एक वर्ष होतंय आपल्या निवृत्तीला. खरं तर गेल्या आठवड्यापासूनच गेल्या वर्षीची रिटायरमेंटची लगबग आठवत होती. कुठे काम उरकायची घाई , तर कुठे वेगवेगळ्या एक्सचेंज मध्ये सेलिब्रेशनची तयारी ! निवृत्तीनंतरच्या आयुष्यावर तर खुपच चर्चा होत होत्या. ऑफिसमधील शेवटचे हळदीकुंकू तर या निमित्ताने आपल्या ग्रुपला आठवणीसाठी एक गिफ्ट होती. रिटायरमेंटची ट्रॉफी करायची लगबग, तर सर्वांना ऑफिसच्या आठवणीची एक भेटवस्तु घेण्याची घाई . कुठे एलपीसी मिळण्यासाठी लगबग, तर कुठे मेडिकल बिल सादर करावयाची घाई. सीजीएचएस घेणार का ? सीजीएचआयएस ? या वर चर्चा. रोजच कौंटडाऊन सुरू झालं होतच. या सर्व गडबडीत आजचा दिवस कधी उगवला ते समजलच नाही. सर्व ऑफिसमध्ये रिटायरमेंट फंक्शन, तर भाषणाच्या फैरी! माझी एमटीएनेल मधील ३५/३६ वर्षे कशी सरली , एमटीएनेलने काय काय दिले वगैरे ,या सर्व आठवणींना उजाळा . रडारड, गळाभेट. आणि.... मन घट्ट करत , ऑफिस मधुन पाय निघत नसतानाही एमटीएनेलला निरोप दिला. आज वर्ष झालं निवृत्तीला .तरीहि असा एकही दिवस नाही गेला की एमटीएनेलची आठवण नाही आली. आपल एमटीएनेल ,आपल्याप्रमाणे असेच बहरत राहू दे, हिच सदिच्छा. फक्त म्हणावेसे वाटते, गेले ते दिन गेले.
*- अलका भुजबळ,मुंबई.*

COMMENTS