समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प* *भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

कोरोनाच्या महासाथीमुळे संकटात सापडलेल्या समाजाच्या सर्वच घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडला असून...


कोरोनाच्या महासाथीमुळे संकटात सापडलेल्या समाजाच्या सर्वच घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडला असून त्याबद्दल मा. मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आपण अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी व्यक्त केली.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोरोनाच्या महासाथीमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने अर्थसंकल्पात आरोग्यासाठी भरभक्कम तरतूद केली आहे. त्याचबरोबर देशाची अर्थव्यवस्था संकटातून बाहेर पडून गतीने आर्थिक विकास होण्यासाठीही या अर्थसंकल्पात विचार केला आहे. देशातील पायाभूत सुविधांच्या विकासावर अर्थसंकल्पात भर दिला आहे. त्यामुळे समाजाच्या सर्व घटकांना दिलासा मिळणार आहे.

नाशिक मेट्रो व नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्र सरकारात चांगली आर्थिक तरतूद केल्याचे त्यांनी स्वागत केले.

ते म्हणाले की, लघू उद्योगांना चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीला अधिक चालना मिळेल. पंचाहत्तरपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना आयकर रिटर्न भरण्यापासून सवलत देण्यात आली आहे. अशा प्रकारच्या विविध तरतुदींमुळे मध्यमवर्गीयांना विशेष दिलासा मिळेल.

त्यांनी सांगितले की, शेतकरी व ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. ग्रामीण पायाभूत सुविधांसाठीची तरतूद 30,000 कोटींवरून वाढवून 40,000 कोटी रुपये केली आहे. सूक्ष्म सिंचनासाठीची तरतूद दुप्पट केली आहे. शेतीसाठीच्या कर्जपुरवठ्याची मर्यादा वाढवून साडेसोळा लाख कोटी रुपये केली आहे. ग्रामीण भागातील प्रॉपर्टीची मालकी स्पष्ट करणारी स्वामित्व योजना देशभर लागू केली आहे. पिकांच्या बाबतीत मूल्यवर्धन व निर्यातीसाठीची ‘ऑपरेशन ग्रीन स्कीम’ योजनेचा विस्तार करून ती आता 22 पिकांना लागू केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पायाभूत सुविधांमध्ये वाढ करता यावी यासाठी कृषी पायाभूत सुविधा निधी उपलब्ध करून देण्याचाही निर्णय अर्थसंकल्पात जाहीर केला आहे. शेतकऱ्यांसोबतच अनुसूचित जाती – जमाती अशा सर्व घटकांचा या अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे.

ते म्हणाले की, गहू, तांदूळ, डाळी, कापूस यांच्या खरेदीसाठी मोदी सरकारने किती मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला याची सविस्तर आकडेवारी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात दिली. एमएसपीच्या आधारे धान्य खरेदीबाबत मोदी सरकार किती चांगल्या रितीने काम करत आहे, हे यावरून स्पष्ट होते.

मुंबई, 01 फेब्रुवारी 2021

*राम मंदिरासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचे समर्पण*

अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारणीसाठी आज आ. चंद्रकांतदादा पाटील निधी संकलन अभियाना अंतर्गत समर्पण केले. श्री. पाटील यांनी समर्पण निधीचा धनादेश पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी भागाचे संघचालक दिगंबरजी परुळेकर, संभाजीनगर कार्यवाह सुधीरजी जवळेकर, कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनित जोशी, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, सुधीरजी पाचपोर आदी उपस्थित होते.

अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारणीसाठी संपूर्ण देशभरात निधी संकलन अभियान सुरु असून आज आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपले योगदान दिले. श्री. पाटील यांनी आज सकाळी आपल्या समर्पण निधीचा धनादेश पुणे महानगर संघचालक रविंद्रजी वंजारवाडकर यांच्या कडे सुपूर्द केला.

समर्पणानंतर श्री. पाटील म्हणाले की, "प्रभू श्रीराम आमचे श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीत भव्य मंदिर उभारणे हे आमचे ध्येय आहे. त्यासाठी समर्पण म्हणजे आमची श्रद्धा आहे."

*Maharashtra economy to benefit from union budget*

*BJP national general secretary C. T. Ravi reacts*

Bharatiya Janata Party national general secretary and in charge of Maharashtra C. T. Ravi on Monday welcomed the union budget presented by finance minister Nirmala Sitaraman and said that Maharashtra will be one of the states who will benefit the most due to the boost given to economic development in the budget.

He welcomed the provision of funds for Nashik Metro and Nagpur Metro – phase 2. He said that thanks to the Prime Minister Narendra Modi government initiative, metro development in Mumbai, Pune and Nagpur is progressing well. The budget announcement will provide further support to development of metro in Maharashtra.

He said that in the union budget there are many provisions to speed up economic development and reforms. Maharashtra is on the forefront of industrial development especially automobile sector and hence the state will benefit more from the budget provisions.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group