मुंबई दि.२८-राष्ट्रीय मिल मजदूर संघ सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयाच्या वतीने आज ग्रंथप्रदर्शन भरवून आणि कुसुमाग्रजांच्या स्मृतीना उजाळा देऊन मराठी भाषा दिन संपन्न झाला.
मजदूर मंझील मधील ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आलेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी खजिनदार निवृत्ती देसाई होते.
प्रारंभी अध्यक्ष माजीराज्यमंत्री सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी भाषादिना निमित्त दिलेले संदेश वाचून दाखविण्यात आले.
खजिनदार निवृत्त देसाई आपल्या खुमासदार शैलीत म्हणाले,मराठी भाषेला थोर संत परंपरेचा वारसा लाभला आहे.ज्यांचा जन्मदिन मराठी भाषादिन म्हणून संपन्न होतो आहे, असे ज्ञानपीठकार कुसुमाग्रज यांचे आजरामर साहित्य मराठी साहित्यातील मापदंड मानला जातो.
ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल आपल्या भाषणात म्हणाले.राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठीेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाच पाहिजे,अशी ग्वाही देऊन कोट्यवधी मराठी भाषिकांच्या मनात आशेचा हुंकार फुलविला आहे.मराठी भाषा आथांग समुद्रा सारखी समृध्द आहे.पण तिचा अधिक प्रसार झाला पाहिजे.
संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण आपल्या भाषणात खंत व्यक्त करताना म्हणाले ,इतर राज्यात प्रांतिय भाषेला अधिक महत्त्व देण्यात येते.तसे प्रयत्न महाराष्ट्रात व्हावयास हवे. न्यायालयाचे कामकाज मराठीतून व्हावयास हवे,तरच ख ऱ्या अर्थाने तिचा प्रसार आणि प्रचार होईल,असेही बजरंग चव्हाण आपल्या भाषणात म्हणाले.वाचनालयाच्या प्रभारी ग्रंथपाल ममता घाडिगावकर,मोहन पोळ,दिपक वाळवे प्रियंका परब यांनी मराठी भाषे विषयी आपले विचार मांडले. सेक्रेटरी लक्ष्मण तुपे,मधू घाडी,सुहास हरमळकर यांचे सहकार्य महत्त्व पूर्ण ठरले.
★★★

COMMENTS