धर्माबाद (अहमद लड्डा )
महाराष्ट्राच्या सीमेलगत तेलंगणातील एडबिड, मंडळ मुधोळ, जिल्हा निर्मल येथे दरवर्षाप्रमाणे श्री श्री श्री मल्लन्ना देवाची यात्रा दिनांक 26 फेब्रुवारी ते दोन मार्च 2021 पाच दिवस जत्रेचे आयोजन केले आहे.
एक मार्च रोजी दुपारी बारा वाजता जंगी कुस्त्यांचे आयोजन केले असून प्रथम बक्षीस दहा हजार रुपये व 50 ग्रॅम चांदीचे कडे, दुसरे बक्षीस रुपये पाच हजाराचे असून इतर रकमेच्या कुस्त्या होणार आहेत, याच दिवसभर महाप्रसादाचा कार्यक्रम असून रात्री विस्तवावरून पायात वाहन न लेवता शेकडो लोक चालण्याचा कार्यक्रम आहे. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात करीमनगर सिर्सिल्ला चे जडाला रमेश यांचा कार्यक्रम होणार आहे.
या यात्रेत दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मल्लन्ना देवाचा विवाह, 27 रोजी सायंकाळी आळंके, 28 रोजी सायंकाळी मल्लन्ना देवाच्या पालखीची मिरवणूक, एक मार्च रोजी दुपारी कुस्त्यांचे व महाप्रसाद यांचे आयोजन, सायंकाळी विस्तवावरून चालणे आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तर 2 मार्च रोजी समाप्तीच्या दिवशी महिलांना बांगड्या भरण्याचे कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान ग्रामविकास कमिटी एडबिड यांनी केले आहे.

COMMENTS