जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली
पारधी समाज म्हंटले की या समाजाकडे लोकांचा पाहण्याचा द्रष्टीकोण बदलतो, चोरी करणे, लुटमार करणे अशा पध्दतीने या समाजाकडे पाहिले जाते मात्र याला बगल देत हिंगोली तालुक्यातील खरबी येथील पारधी समाजील युवकाने पोलिस दलात उतुंग भरारी घेत पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. सदर युवकाचा आयपीस यतीश देशमुख यांनी सत्कार करत कौतुक केले आहे.
हिंगोली जिल्ह्यात अनेक गावात पारधी समाज आहे. यामधे शहरासह खरबी या गावात पारधी समाज मोठ्या संखेने आहे. हिंगोली जिल्हायातील आत्ता पर्यंत 15 ते 20 पारधी समाजातील युवक, युवती विविध जिल्ह्यात पोलिस दलात कार्यरत आहेत. खरबी येथील माजी सरपंच शामराव काळे यांना पाच अपत्य आहेत. शामराव काळे यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिल्याने त्यांची 3 मुले पोलिस दलात कार्यरत आहेत. ज्यामध्ये विनोद काळे पुणे, पोलिस दलात, गोविंद काळे बिड पोलिस दलात, आणि तिसरा मुलगा संतोष काळे याने पदवी पर्यंत शिक्षण हे आदर्श महाविद्यालयात घेतले. आणि 2007 मधे बिड पोलिस दलात पोलिस कर्मचारी म्हणुन भरती झाला. नूकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत 400 पैकी 341 गुण प्राप्त करून यश संपादण केले त्याची पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाली. गुरूवारी संतोष काळे व त्याचे वडिल शामराव काळे यांचा हिंगोली येथिल उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयपिएस यतीश देशमुख यांनी सत्कार केला. यावेळी वाहतुक शाखेत कार्यरत पोलीस कर्मचारी वसंत चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी आयपिस यतीश देशमुख यांनी पारधी समाजातील युवकांनी वाम मार्गाला न लागता उच्च शिक्षण घेऊन संतोष काळे या युवकाचा आदर्श घेऊन अधिकारी होण्याचे स्वप्न बघावे असे आवाहन पारधी समाजातील युवकांना केले आहे.. तसेच संतोष काळे यांच्या वडिलांनी तिन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन पोलिस दलात भरती केल्याने त्यांचे विशेष कौतुक केले.

COMMENTS