अजय बाहेती यांच्या कार्याची केली प्रशंसा
नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
ना.बचू कडू यांनी बुधवारी दुपारी कुष्णुर या औद्योगिक वसाहतीतील इंडिया मेघा फूड अनाज ली.ला भेट देऊन येथे उत्पादित होणाऱ्या एका छताखालील विविध उत्पादनाची माहिती घेतली व कुष्णुर सारख्या ग्रामीण भागातील औद्योगिक वसाहतीत अजय बाहेती यांनी केलेल्या
हेती यांनी उभारलेल्या इंडिया मेघा अनाज ने अंत्यत कष्टाने आपल्या प्लांट मध्ये 16 प्रकारचे उद्योग उभारले असून त्यांच्या या कार्या ने या भागातील हजारो बेरोजगार युवकांना रोजगाराची उपलब्धी झाली.त्या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले ना.मंत्री बचू कडू यांनी पूर्ण प्लांट मध्ये जाऊन आपल्या विशेष शैलीत पाहणी व चौकशी केली.तसेच प्रत्येक युनिट मध्ये जाऊन सखोल अभ्यास पूर्ण माहिती घेतली तबबल तीन तास या युनिट मध्ये त्यांनी कामगार लोकांना ही चर्चा करून येथील कामगारांना जेवणासाहित मिळणाऱ्या सुविधे बद्दल समाधान व्यक्त केले.
मंत्री बचू कडू यांनी बाहेती परिवाराने केलेल्या पाहुणचार घेत कामगारां समवेत भोजन केले.व अजय बाहेती यांच्या कार्यकुशलतेने केलेल्या कामाचे मनस्वी कोतुक करून त्यांना मराठवाड्यात केलेल्या या उद्योगाच्या धारिष्ट्या बरोबरच विदर्भात विकास साध्य करण्या साठी अमरावती येथे उद्योग उभारण्याचे निमंत्रण दिले.या वेळी मेगा अनाज क.चे अजय बाहेती . राधेश्याम सर .अप्पुसेठ. पारसेवार.चंद्रकांत आईलवार. ईत्यादी उपस्थित होते.

COMMENTS