नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे न करता बोगस कामे होत असून या बोगस कामाची त्रिसदस्यीय समिती गठित करून व जाय मोक्यावर जाऊन दुसऱ्या या जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी व कॉन्ट्रॅक्टदार आला काळया यादीत टाकून बोगस कामाला सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणेबाबत असे पत्र दिनांक 5 .9. 2020 रोजी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कार्यालय अधिक्षक अभियंता औरंगाबाद विभाग यांच्याकडे व मा विभागीय आयुक्त साहेब आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्याकडे दिनांक 2. 11 .2020 रोजी देण्यात आले असून महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कार्यालय अधिक्षक अभियंता औरंगाबाद यांचे पत्र दिनांक 25 11 2020 रोजी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था नांदेड यांच्या नावाने काढून पुढील तपास करून दोषींवर कारवाई करण्यात यावे असे पत्र देऊन सुद्धा आज पर्यंत चालू असलेल्या नायगांव अंचोली हिप्परगा कुष्णूर बरबडा टाकळी रुई बु ते इज्जतगाव कांडाळा ते धानोरा टाकळी तमा मांजरम दरेगाव कोलंबी हंगरगा परडवाडी अंचोली ते नरंगल आधी आठ कामाचा समावेश आहे यादीतील काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे चालू आहेत हे सर्व कामे करताना कॉन्टॅक्ट दाराने जनतेच्या हितापेक्षा स्वतःच्या आर्थिक हिताला प्राधान्य दिले आहेत व तालुक्यातल्या कामाची अध्यापक चौकशी झालेली नसून संबंधित अधिकाऱ्याने झोपेचे सोंग घेत आहेत गुत्तेदार व संबंधित अधिकाऱ्यांनी हातमिळवणी केली आहे असा शंका निर्माण होत आहे शासनाने गोरगरीब जनतेच्या सोयीसुविधांसाठी रस्ते विकास कामावर लाखो रुपये खर्च करून रस्ते कामाचा दर्जा निकृष्ट होत असल्यामुळे नायगांव तालुक्यातून जनतेनी नाराजी व्यक्त करीत आहेत तरी संबंधित अधिकाऱ्यांनी चालू असलेल्या कामाकडे लक्ष देऊन त्या कामाचा दर्जा व चांगले काम करून घेण्यात यावे अशी भारतीय मराठा महासंघाच्या वतीने व तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे,

COMMENTS