नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नांदेड जिल्हा अंडवृद्धी मुक्त जिल्हा करण्याच्या दिशेने दि.१ फेब्रुवारी रोजी नायगांव येथील पंचायत समिती सभागृहात नायगांव व बिलोली तालुक्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य पर्यवेक्षक हिवताप (HS), आरोग्य सहाय्यक (HA), आरोग्य कर्मचारी (MPW) व हत्तीरोग नियंत्रण उपपथक बरबडा,नायगांव, बिलोली व कुंडलवाडी येथील आरोग्य सहाय्यक (HA), आरोग्य कर्मचारी (MPW) यांची संयुक्तिक अंडवृद्धी शस्त्रक्रिया बाबत आढावा बैठक घेण्यात आली.डॉ एकनाथ माले उपसंचालक आरोग्य सेवा लातूर यांनी आरोग्यवर्धेनी केंद्रात देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा बद्दल सविस्तर माहिती समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) यांना दिली. आपल्या आरोग्यवर्धेनी कार्यक्षेत्रातील अंडवृद्धी रुग्णांना भेटी देऊन त्यांना अंडवृद्धी शस्त्रक्रिया करून घेणे बाबत मतपरिवर्तन करणे व अंडवृद्धी रुग्णाची शस्त्रक्रिया करून घेण्याविषयी सर्व आरोग्य कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
पुणे येथील डॉ. संजीवकुमार जाधव सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हत्तीरोग) यांनी तालुका नायगांव अंडवृद्धी रुग्ण ९३, तालुका बिलोली अंडवृद्धी रुग्ण ७१ असे एकुण १६४ अंडवृद्धी रुग्णाचा गावनिहाय व कर्मचारी निहाय आढावा घेतला व अंडवृद्धी शस्त्रक्रिया माहे फेब्रुवारी व मार्च अखेर पुर्ण अंडवृद्धी शस्त्रक्रिया करण्या बाबत कर्मचारी यांच्या कडून नियोजन करून घेतले. अंडवृद्धी शस्त्रक्रिया बाबत येणाऱ्या अडीअडचणी ची माहिती घेतली व कर्मचारी यांच्या सर्व शंकेचे निराकरण केले.
नायगांव मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांनी सुध्दा सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. आरोग्य सेवा सुरळीत व व्यवस्थित रित्या पार पाडव्या बाबत अवगत केले.
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम बाबत डॉ आकाश देशमुख जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड यांनी पावरपॉईट प्रेझेंटेशन द्वारे किटकजन्य आजाराची माहिती दिली व सर्व अंडवृद्धी रुग्णाची शस्त्रक्रिया करण्या बाबत नियोजन करून घेतले.
पुढील काही दिवसात जिल्ह्यातील उर्वरित तालुकाची संयुक्तिक अशीच बैठक घेऊन अंडवृद्धी शस्त्रक्रिया बाबत नियोजन करण्यात येणार आहे व नांदेड जिल्हा अंडवृद्धी मुक्त जिल्हा करण्याचे नियोजन आहे असे डॉ आकाश देशमुख जिल्हा हिवताप अधिकारी नांदेड यांनी सांगितले.
आढावा बैठकीचे सुत्रसंचालन सत्यजीत टिप्रेसवार जिल्हा पर्यवेक्षक यांनी केले.
सदरील बैठकीस डॉ निळकंठ भोसीकर जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड, डॉ बालाजी शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, डॉ गुंटूरकर वैद्यकीय अधिक्षक नायगाव, डॉ शेख बालन तालुका आरोग्य अधिकारी नायगाव, डॉ गणपती वाडेकर तालुका आरोग्य अधिकारी बिलोली, रामलू लखमावाड आरोग्य पर्यवेक्षक बिलोली, दमोदर मुंडे आरोग्य पर्यवेक्षक नायगाव, वाईकर, मोरे, अंजनीकर, मल्हार तोटरे, वाघमारे, कळसे, जाधव, जे.के.कदम, गटुवार,अशोक मुसळे आरोग्य सहाय्यक, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय नायगाव येथील अनुप जगताप, शैलेश मच्छरलावार, भास्कर ढेरे नायगाव व बिलोली तालुक्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य कर्मचारी व हत्तीरोग नियंत्रण उपपथक बरबडा, नायगाव, बिलोली, कुंडलवाडी येथील आरोग्य सहाय्यक व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS