*विटा(बु.)च्या सरपंचपदी सौ.लताबाई आरबाड तर उपसरपंचपदी महादेव हारकाळ यांची निवड* *ग्रामस्थांची वचनपूर्ती करणार:-बाळासाहेब आरबाड*

सोनपेठ/प्रतिनिधी दोन तालुक्याचे लक्ष लागलेल्या पाथरी तालुक्यातील विटा  (बु.)ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ.लताबाई आत्माराम आरबाड तर उपसरपंचपदी ...


सोनपेठ/प्रतिनिधी

दोन तालुक्याचे लक्ष लागलेल्या पाथरी तालुक्यातील विटा 

(बु.)ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ.लताबाई आत्माराम आरबाड तर उपसरपंचपदी महादेव शंकरराव हारकाळ यांची दोन विरुद्ध सात मतांनी निवड झाली आहे.या निवडीसाठी परभणी जिल्हा पोलीसातर्फे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून साईराज कुंभार यांनी काम पाहीले तर त्यांना तलाठी मिलिंद विटेकर,ग्रामसेवक संदीप भोसले, नारायण हारकाळ, मदन आरबाड यांनी सहाय्य केले.अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाळासाहेब आरबाड यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास परिवर्तन पँनलने नऊपैकी सात जागा जिंकून विजयी पताका फडकवली होती.सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीसाठी तालुका प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन ८फेब्रुवारी रोजी निवड करण्यात आली.यात बाळासाहेब आरबाड यांच्या नेतृत्वाखालील पँनलमधील सरपंचपदासाठी लताबाई आत्माराम आरबाड यांचा तर उपसरपंचपदासाठी महादेव शंकरराव हारकाळ यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले.या निवडीसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तीप्पलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.या निवड प्रक्रियेसाठी नारायण हरिबुवा गिरी,चंद्रकला अच्युतराव हारकाळ यांनी अनुपस्थिती लावली होती.तर निवड प्रक्रियेत उत्तम दासीराम हारकाळ,अस्मिता मदनराव देंडगे,गौळण भानुदास तुपसमिंदर,अनिता बाबासाहेब मालसमिंदर,कीस्कींदा भास्कर आरबाड या सदस्यांनी भाग घेतला होता.या निवडीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत परिसरात गर्दी केली होती.यावेळी प्रकाशराव हारकाळ,तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शिवाजीराव हारकाळ,माजी सरपंच उत्तमराव आरबाड,पांडुरंग हारकाळ,बालासाहेब हारकाळ,माजी सरपंच नारायण बदाले,उमेश हारकाळ,सुरेश आरबाड,बळीराम हारकाळ,प्रा.कैलास आरबाड,संजय वाघमारे,राजेश हारकाळ,मदन देंडगे,भास्कर आरबाड,गणेश हारकाळ,पंडीत आरबाड,डी.के.हारकाळ,रमेश हारकाळ,प्रभाकर आरबाड, सुधाकर आरबाड,सुदाम(देवा)आरबाड,माऊली आदत,मुंजाभाऊ आरबाड,अशोक आरबाड,भीमराव आरबाड,दत्तराव आरबाड,अक्षय आरबाड,अमर हारकाळ,विजय आरबाड,माऊली आरबाड,आदींनी नवनियुक्त सरपंच उपसरपंच यांचे स्वागत केले.

*ग्रामस्थांची वचनपूर्ती करणार:-बाळासाहेब आरबाड*

*ग्रामविकास परिवर्तन पँनलच्या माध्यमातून ग्रामस्थांनी आमच्यावर विश्वास दाखवून आमचे हात बळकट करण्यासाठी बळ दिले आहे.आम्ही गावाच्या सर्वांगिन विकासासाठी प्रयत्नशील आहोतच शिवाय ग्रामस्थांची वचनपूर्ती करण्यासाठी वचनबद्ध आहोत.त्यामुळे ग्रामस्थांच्या विश्वासाला तडा जाणार नाही या शब्दाशी बांधील असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाळासाहेब आरबाड यांनी ग्लोबल श बोलतांना दिली.*

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group