नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
शहरातील सुप्रसिद्ध ब्ल्यु ब्लेस इंग्रजी शाळेतील विद्यार्थिनी व नरसी जि. प. सदस्य माणिकराव लोहगावे यांची कन्या कु. स्नेहल लोहगावे ही जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय नायगावच्या वतीने दरवर्षीच घेत असलेल्या जिल्हा पातळीवरील कै. अमृतराव पाटील चव्हाण वकृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची बाजी मारली आहे.
एज्युकेशन सोसायटी नायगाव संचलितने जिल्ह्यातील अनेक शाळेतील शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनी साठी कै. अमृतराव पा. चव्हाण वकृत्व स्पर्धेचे विचारपीठ निर्माण केले असून 2020, 21 साठी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत नायगाव शहरातील प्रसिद्ध असलेली ब्ल्यु ब्लेस इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारी कु. स्नेहल माणिकराव लोहगावे हिने जिल्हा पातळीवरील या वकृत्व स्पर्धेत सहभाग घेऊन द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम 1550 रुपये देऊन सन्मानित करण्यात आले असून आपल्या नावासह शाळेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल सदर इंग्रजी शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.के हरिबाबु, मुख्याध्यापिका सौ. लक्ष्मीताई के हरिबाबु यांनी कु.स्नेहल लोहगावेचा सन्मान केले तर सर्व स्तरातून कु. स्नेहलचे तोंड भरून अभिनंदन व कौतुक होत आहे.

COMMENTS