नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगांव तालुक्यातील कृष्णूर येथील कार्यकर्ते केरबा रावते यांची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग नायगांव तालुकाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग नांदेड जिल्हाध्यक्ष कपिल जुन्नेकर यांनी निवड केली.
सदर निवडीचे नियुक्ती पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील हस्ते देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव बाळासाहेब भोसीकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष मारोतराव कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे धर्माबाद माजी तालुकाध्यक्ष हणमंत जगदंबे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस धर्माबाद तालुकाध्यक्ष नागेंद्र कदम आदी उपस्थित होते.
या निवडीबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मा. कामलकिशोरजी कदम, माजी आ. शंकर अण्णा धोंडगे, प्रदीप नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप धोंडगे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

COMMENTS