नांदेड जिल्ह्यात 76 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू 1 हजार 349 अहवालापैकी 1 हजार 262 निगेटिव्ह

Savdhan नांदेड (जिमाका) दि. 23 :- मंगळवार 23 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 76 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आह...

Savdhan


नांदेड (जिमाका) दि. 23 :- मंगळवार 23 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 76 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 26 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 50 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 32 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 1 हजार 349 अहवालापैकी 1 हजार 262 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 23 हजार 284 एवढी झाली असून यातील 22 हजार 61 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 418 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 10 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. सोमवार 22 फेब्रुवारीला किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 594 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 20, देगलूर कोविड रुग्णालय 1, गोकुंदा कोविड रुग्णालय 1, हदगाव कोविड रुग्णालय 1 खाजगी रुग्णालय 8 असे एकूण 32 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.74 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 16, भोकर तालुक्यात 1, किनवट तालुक्यात 3, मुखेड तालुक्यात 1, अर्धापूर 1, कंधार 1, लोहा तालुक्यात 3 असे एकुण 26 बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 34, भोकर तालुक्यात 2, किनवट तालुक्यात 7, मुदखेड तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 2, हदगाव तालुक्यात 2, लोहा तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 1 असे एकूण 50 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 418 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 31, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 52, किनवट कोविड रुग्णालयात 19, हदगाव कोविड रुग्णालय 5, देगलूर कोविड रुग्णालय 4, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 224, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 51, खाजगी रुग्णालय 32 आहेत.   

मंगळवार 23 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 153, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 52 एवढी आहे.   

· जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 23 हजार 821

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 96 हजार 89

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 23 हजार 284

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 61

एकुण मृत्यू संख्या-594                            

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 94.74 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-418

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-10.      

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group