हदगाव ता.22फेब्रु.हदगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते अहेमद चाउस यांच्या अध्यक्षते खाली ए.आय.एम. आय.नांदेड तर्फे एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश एम.आय.एम.कार्यालयाचे उद्घाटन व पदाधिकारी यांची निवड .
एम.आय.एम पदाधिकारी शहरात दाखल होताच जिल्हा अध्यक्ष बेग साहेबांनी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक पाटिवर पुष्प हार टाकुन अभिवादन करुन तसेच बदरोदिन साहेब दर्गा यांच्या मजारीवर चादर चढवून व तसेच भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद चौक पाटीवर पुष्प हार टाकुन पुढील कार्यक्रमास सूरुवात करण्यात आली.कार्यालचे उद्घाटन करून मौलाना आजाद शादी खाना येथे हाफेज जमील कूरेशी यांनी कुरआन शरिफ तिलावत (पठन) नंतर नांदेडचे ए. आय.एम.पदाधिकारी पैकी मुख्य वक्ते म्हणुन नवाब बेग ,एडवोकेट मुश्ताक,यवतमाळचे माजी जिल्हा अध्यक्ष इरफान भाई,ग्रामीन विधान सभा अध्यक्ष बाबा खान साहेब भोकर,युवा जिल्हा अध्यक्ष मोहसिन खान, नांदेड जिल्हा अध्यक्ष मिंर्झा अमजद बेग साहेब यांनी थोडक्यात आपआपले विचार मांडून जनहितासाठी कसे काम करावे आपला जास्तीत जास्त वेळ समाज सेवे साठी कसा देता येइल हे समजावुन सांगितले.व तसेच जिल्हा अध्यक्ष याच्यां हस्ते एम आय एम तालुकाध्यक्ष म्हणुन अहमद चाउस यांची निवड करण्यात आली.हाफेज जमील कूरेशी हदगाव,हिमायतनगर तालुका विधानसभा अध्यक्ष, शे.बिलाल मामु यांची शहराध्यक्ष पदी व तसेच याहया खान सर यांची कार्य अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.नव्याने तालुका अध्यक्ष पदभार स्विकारणारे श
मा.अहमद चाउस यांनी या प्रसंगी बोलतांना "मी जिवाचे रान करुन जनहितासाठी जनतेच्या अडीअडचणी दुर करण्याचे काम करेन व येणारी हदगाव नगर परिषद निवडणुक चांगले उमेदवार देउन पुर्ण ताकतीने लढणार" अशी ग्वाही दिली.व तसेच तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल बोलतांना"माझी तालुका अध्यक्ष पदी निवड केल्या बद्दल मी ए.आय.एम.आय.एम चे महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी मराठवाडा अध्यक्ष श्री.फेरोज लाला खान साहेब,जिल्हा अध्यक्ष श्री.अमजद बेग साहेब,उप जिल्हा अध्यक्ष मोहम्मद रब्बानी साहेब,युवा जिल्हा अध्यक्ष मोहसिन,अॅड.मुश्ताक सर, नवाब बेग, बाबा खान इतर सर्वांचा मि आभारी आहे"असे अहेमद चाउस यांनी नांदेड एम.आय.एम.चे संपुर्ण पदाधिकारी यांचे आभार मानले.
विषेश म्हणजे या संपुर्ण कार्यक्रमात राज्यात कोरोना बाधित संख्या वाढत असल्याचे भान ठेउन सेनिटायझर मास्क चा काटेकोरपणे वापर करण्यात आला होता.

COMMENTS