गावातील नागरिकांच्या अनेक वेळा निवेदने,मागणी,आंदोलने, रस्ता रोखे केलेल्या प्रयत्नांना यश*.
धर्माबाद (अहमद लड्डा)
- धर्माबाद ते आतकुर आतकुरच्या नागरिकांना, शाळकरी मुलाना वाहनांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करवी लागत होती.आतकुर वासियांनी अनेक वेळा उपोषने करून, निवेदने देऊन, रस्ता रोको करून शेवटी रस्त्याच्या कामासाठी 4 कोटी 96 लाखाचा निधी महाविकास आघाडी ने मंजूर केले आहे.
या रस्त्याच्या कामासाठी आतकुरचे प्रतिनिधी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यसह गावातील नागरीकनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
धर्माबाद जवळ असलेल्या आतकुर या गावाला जाण्यासाठी असलेला रस्ता पुर्णतः उखडून गेला होता.गावकऱ्यांना येण्या-जाण्यासाठी मोठा त्रास होत असे विशेषतः पावसाळ्यात शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत होता.
या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा प्रशासनाकडे अनेक निवेदन देण्यात आली होती पण राजकीय दरबारात न्याय मिळाला नसल्याने हा विषय प्रलंबित पडला होता.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्याने आतकुर रस्त्याचे काम मार्गी लागला.
आतकुर गाव ते आतकुर फाटा हा प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित पडलेल्या मार्गाचे आता भाग्य उजळणार आहे.सदरील मार्गाच्या निधीला प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे . महाविकास सरकारनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे व जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांचे याबद्दल अतकुर वासीयांनी विशेष आभार मानले आहे.

COMMENTS