नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
नायगांव नगरपंचायत येथे माॅ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या वेळी नगराध्यक्ष शरद भालेराव. उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण.नगरसेवक पांङु पाटील चव्हाण. श्रीनिवास शिंदे सुमित पाटील कल्याण. कार्यालयीन अधीक्षक संतराम जाधव. वरिष्ठ लिपिक रामेश्वर बापुले. श्रीधर कोलमवार. ज्ञानेश्वर जाधव .रमेश चव्हाण. मुन्ना मगरूळे.क्षीरसागर साहेब. साबळे साहेब. पाटील साहेब. व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ ह्या शिवाजी राजाने निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मार्गदर्शक होत्या) ----- प्रा डॉ. शंकर गड्डमवार.
नायगांव (बा.) येथील शरदचंद्र महाविद्यालयामध्ये राजमाता, राष्ट्रमाता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्तीक जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ. शंकर गड्डमवार यांनी बोलताना म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांचा हिंदवी स्वराज्य अर्थात रयतेचे राज्य निर्माण करण्यामध्ये सिंहाचा वाटा होता. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करू शकले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांस्कृतिक विभाग प्रमूख प्रोफेसर बलभीम वाघमारे हे होते. पुढे बोलताना डॉ. गड्डमवार म्हणाले की, मॉ जिजाऊ ह्या बालशिवाजीना लहानपणापासूनच पराक्रमाचे धडे शिकविण्यासाठी रामायन, महाभारत, कृष्ण, अर्जुन यांच्या पराक्रमाच्या कथा सांगित असत त्यामुळे शिवाजी राजाचे मनोधैर्य वाढले. मॉ जिजाऊच्या मार्गदर्शनानुसारच सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊनच शिवाजी राजांनी स्वराज्याचे स्वप्न साकार केले. शिवाजीना अलीकडच्या काळात मुस्लिमविरोधी असल्याचे दाखविले गेले पण शिवाजी राजांनी कधीच असा जात व धर्मभेद केला नाही. शिवाजीच्या प्रमूख 21 अंगरक्षकापैकी 13 अंगरक्षक हे मुस्लिम होते याशिवाय त्यांच्या तोफखान्याचा,नेव्हीच्या आरमाराचा प्रमूख मुस्लिम होते, त्यांचा वकील काजी हैदर होता तसेच शिवाजी महाराजांनी आपले गुरु म्हणून संत तुकाराम महाराज, सुफी संत, मौनी बाबा यांना मानले याशिवाय रायगडावर मुस्लिमांना नमाज पढण्यासाठी मस्जीद बांधून दिली त्यामुळे शिवाजी राजे हे मुस्लिमविरोधी नसून त्यांचे हितचिंतक होते पण राजकारण करणाऱ्यांनी हिंदू मुस्लिम असा वाद निर्माण करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला आहे या बाबी शिवाजीच्या अनुयायांनी समजून घेणे गरजेचे आहे. त्यांच्या जयंतीचा वाद देखील मुद्याम तेवत ठेवण्यात आला. हा वाद इस 2000 मध्ये संपुष्टात येऊन महाराजांची जयंतीची तारीख 19 फेब्रूवारी ही सरकारने निश्चित केली आहे तरीही तिथीनुसार अजूनही चालूच आहे. शिवाजी राजे हे स्वतःच्या कतृत्वानेच हिंदवी स्वराज्य निर्माण केले पण त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या राष्ट्रमाता ह्या जिजाऊ माँ साहेब होत्या असे डॉ. गड्डमवार यांनी म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस दोन्ही महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रोफेसर डॉ. प्रकाश नांगरे, प्रोफेसर डॉ. दादाराव पानपट्टे,प्रोफेसर डॉ. वट्टमवार, प्रा.डॉ.के हरीबाबू प्रा.डॉ. नामदेव सानप, प्रा.डॉ. सिद्दीकी, प्रा.डॉ. शाम पाटील, ग्रंथपाल डॉ.बी.आर. लोकलवार,प्रा.डॉ. राऊतखेडकर मॅडम, प्रा.डॉ. संजयकुमार भालेराव, प्रा. रोकडे, विश्वनाथ बेळगे,बालाजी कावडे, संतोष भालेराव, बालाजी काळे इत्यादी उपस्थित होते.
(जनता हायस्कूल क. म. वि.नायगांव (बा) येथे राजमाता माँ साहेब जिजाऊ यांची जयंती आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती शाळेचे प्राचार्य श्री के. जी. सूर्यवंशी,उपप्राचार्य प्रा. प्रभाकर पवार,पर्यवेक्षक प्रा.गणेश देवडे, पर्यवेक्षिका सौ. शोभाताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रा. सौ. राजेश्वरी कदम यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा उजाळा विद्यार्थ्यांसमोर मांडला. कार्यक्रमात माँसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. उत्तम पाटील यांनी केले तर आभार प्रा पी. डी. जाधव यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.कार्यक्रम कोविड नियमाचे काटेकोरपणे पालन करून घेण्यात आला. कार्यक्रमाला सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


COMMENTS