नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार)
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय, प्राधान्य कुटूंब योजना व शेतकरी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी आधारकार्ड व मोबाईल क्रमांकाची Ekyc रास्तभाव दुकानदाराकडे रविवार 31 जानेवारी 2021 पूर्वी करुन घ्यावे,केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शिधापत्रिकाधारकांनी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक सत्यापण करुन घ्यावे असे कळविले आहे. ज्या शिधापत्रीका धारकांनी आपले आधार व मोबाईल क्रमांक अपडेट केले नाहीत. त्याशिधापत्रीकाधारकांना धान्य वाटप करता येणार नाही. अशा शिधापत्रिकाची वगळणी डिलीट करण्यात येणार आहेत. हे लाभार्थी अन्नधान्यापासुन वंचित राहणार आहेत. यांची सर्वस्वी जबाबदारी शिधापत्रीका धारकांची राहणार आहे. असेही त्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.ज्या RC मध्ये PoS वर ज्या सदश्यांच्या नावासमोर आधार नंबर दिसत नाही अश्या सदश्यांची PoS मशीन द्वारे eKYC करून आधार सिडिंग करण्या संदर्भात वरील विषयास अनुसरून सर्व रास्त भाव धान्य दुकान परवाना धारक आपणास कळवण्यात येते की ज्या RC मध्ये PoS वर ज्या सदश्यांच्या नावासमोर आधार नंबर दिसत नाही अश्या सदश्यांची PoS मशीन द्वारे eKYC करून आधार सिडिंग ही 31.01.2020 पर्यन्त पूर्ण 100% करावी अन्यथा पुढील महिन्याचे त्या सदश्यांचे धान्य देण्यात येणार नाही.माहे जानेवारी 2020 चा डेटा उपलब्ध झाला आहे. माहे जानेवारीचे धान्य घेण्या साठी जेव्हा लाभार्थी येतील तेव्हा धान्य वाटप करण्यासाठी आपण जेव्हा PoS वर RC नंबर टाकून तेव्हाआपल्याला मोबाईल नंबर टाकण्या साठी एक बॉक्स ओपन होईल तेव्हा त्या कुटुंबातील कोणत्याही सदश्यांचा मोबाईल नंबर तेथे नमूद करून सबमिट करावा त्या नंतर आपल्याला कुटुंबातील सर्व सदस्य व त्यांच्या नवा समोर आधार नंबर दिसेल. ज्या सदश्यांच्या नावासमोर आधार नंबर दिसणार नाही अश्या सदश्यांला आधार कार्ड घेऊन दुकानात बोलावून त्याची PoS वरील आधार सर्व्हिस या मेनू मधून eKYC करायची आहे. धान्य घेण्या साठी जो लाभार्थी आलेला आहे त्या लाभार्थ्याला स्पष्ट सांगायचे आहे की आपल्या कुटुंबातील या सदश्यांचे आधार लिंक नाही आधार कार्ड घेऊन सदश्यांला स्वतः या अन्यथा पुढच्या महिन्या पासून या सदश्यांचे धान्य मिळणार नाही. असे आवाहन तहसीलदार गजानन शिंदे तसेच पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार नंदकिशोर भोसीकर.महसुल सहाय्यक शेख युनुस .अव्वल कारकून आर.आर.आलमवाड. ईत्यादीनी केले आहे.
COMMENTS