माजलगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा दर्पण पुरस्कार २०२१ हा आज दि .१६ जानेवारी रोजी तुकाराम येवले यांना प्रदान केला जात आहे . त्या निमीत्त त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न .... माजलगाव पत्रकार संघाचा दर्पण पुरस्कार मा.श्री.तुकाराम येवले यांना प्राप्त झालाही आनंदाची बाब आहे.ज्यांची लेखनि सातत्याने पीडित , दुखीत , बंचित , यांच्यासाठी तळपत राहिली . तुकाराम येवले यांनी शासकीय वेवस्था , राजकीय , सामाजिक प्रश्न याची मांडणी महाराष्ट्राच्या चव्हाट्यावर आणली.म्हणून तुकाराम येवले सर्वाना आपले वाटू लागले.सर्व स्थरातील , सर्वच जातीजमातीतील लोकांच्या मनात आपल्या लेखन कार्याने अढळ स्थान निर्माण केले आहे . आज समाजात संवेदनशीलतेने , आपलेपणाने काम करणाऱ्यांची वानवा आहे.बोलणारे भरपूर आहेत पण प्रत्यक्ष काम करणारे , सामाजिक समस्यांना हात घालणारे विरळ आहेत.तुकाराम येवले यांच्या रूपाने माजलगाव तालुक्यास पत्रकार समाजसेवक , म्हणून एक रत्न लाभलेले आहे.सतत लोकात राहुन लोकांचे सुखदुःख माझे आहेत.अशी तळमळ सातत्याने त्यांच्या कार्यातून दिसून येते .ज्यांना कोणीच नाही अशांचे वाली तुकाराम येवले आहेत.मायबापासरखा सर्वांना आधार ठरले . म्हणून लोक त्यांना बापू म्हणू लागले . तुकाराम येवले म्हणजे अजातशत्रू वेक्तीमत्व.त्यांना कोणीच शत्रू नाही . सर्वसामान्य शेतमजुरांच्या घरातून येऊनही , कोणतेही आर्थिक , राजकीय पाठबळ पाठीमागे नसताना असामान्य कार्याची श्रीमंती आज सर्वांच्या नजरेत भरणारी आहे.एखादा प्रश्न कोणापुढे निर्माण झाला की , अरे चला येवले बापूकडेते आपलाप्रश्न नक्कीच सोडवतील .ही भावना निर्माण होते.तुकाराम बापूकडे जाण्यासाठी ओळखीची गरज नाही.आपण समस्या सांगावी आणि त्यांनी नाही म्हणावं असं कधीच कोणाच्या वट्याला आलं नाही . सामान्य जणांच्या वेदनेला कुंकर घालणे हेच माझे कार्य आणि या जीवनाच सर्व आहे.एक समंजस सरळ , निस्वार्थ , एक साधा माणूस पण लोककार्याचा महामेरू म्हणजे तुकाराम बापू आहेत.समाजमन निरोगी असेल तर | समाजाचं आरोग्य चांगले राहील सर्वजण चांगल्या पद्धतीने जगतील.साऱ्या भेदाच्या भिंती पार करून सर्वच जातीधर्मातील माणसाच्या हृदयात आपलं एक घर करणारे तुकाराम बापूचे विचार गंगेच्या पाण्याअरखे निर्मळ आहेत . आपले ज्ञान , लेखणी समाजाला राष्ट्रालाबाहून टाकून समाजवेवस्थेत बदल झाला पाहिजे , माणुसकीचे विचार आणि आचार हाच तुकाराम बापुचा प्रपंच झाला आहे.तुकाराम बापूंनी प्रचंड माणसं वाचली , दुःख पचविली आणि या वेदनेच्या उत्सवाला आपली लेखणी चालविली . तुकाराम बापूच्या जनकार्याचा आणि वेदनेच्या लेखणीचा आम्हा तमाम जनतेला गर्व आहे.बापू आपले मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा .
-ज्ञानेश्वर गवते माजलगाव

COMMENTS