मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी
तालुक्यातील जिल्हा परिषद चांडोळा गटातील ग्रामीण भागात रस्त्याचे काम अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने त्या रस्त्यांना विकासाची गती देण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर व जि.प.महिला व बालकल्याण सभापती सौ.सुशिलाताई बेटमोगरेकर यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या गट ब अंतर्गत रस्त्यांचे विविध विकासकामे व मजबुतीकरण करण्यासाठी चार कोटी रुपयांची निधी मंजूर करून रस्त्याच्या विविध विकासकामाचे उद्घाटन दि.२८ रोजी माजी आमदार हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील चांडोळा गटातील ग्रामिण रस्त्यांना नव्याने उभारणी देण्यासाठी माजी आमदार बेटमोगरेकर यांच्या प्रयत्नाने नंदगाव-सलगरा-चांडोळा ७० लक्ष, नंदगाव-डोंगरगाव ७० लक्ष, बेटमोगरा ते शिवलिंग बादशाह ५० लक्ष, जुने माऊली ते नवीन माऊली ६० लक्ष, डोंगरगाव-बावलगाव ५० लक्ष, मंडलापुर-हिब्बट-मोटरगा-खतगाव ५० लक्ष व जुने बावलगाव ते नवीन बावलगाव ५० लक्ष रुपयांची निधी चांडोळा गटातील विविध रस्त्यांचा विकासकामे व मजबुतीकरण करण्यासाठी मंजूर करण्यात आले असून त्याच अनुषंगाने दि.२८ रोजी विविध विकासकामांचे उद्घाटन मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी जि.प.बांधकाम विभागाचे उप अभियंता चितळे, माजी उपसरपंच गौसअली सलगरकर, माजी सरपंच प्र. गंगाधर सोंडारे, कंत्राटदार गीरी महाराज, माजी सरपंच प्र. खुशाल पाटील बेटमोगरेकर, सुरेश नवलेकर, रितेश गुंडावार, शिवा बाऱ्हाळे, बालु पोतदार, प्रल्हाद यरपलवाड, रफीक दफेदार, शिवाजी पाटील, शंकरराव पाटील, व्यंकटराव गुंडे, लक्ष्मणराव माने सह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


COMMENTS