सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी
सोनपेठ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने वेग घेतला असून तालुक्यात एकूण ३९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर सर्वच प्रमुख नेत्यांनी तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले होते.मात्र हे प्रयत्न अपयशी ठरल्याचे चित्र तालुक्यात दिसून आले.लहान गावाची आणि छोट्या बॉडीची निवडणूक बिनविरोध झाल्याने प्रशासनाला यामुळे मदत होणार आहे.यात तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या निवडी बिनविरोध झालेल्या असून उर्वरित ३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रंगत येणार असल्याचे दिसून येत आहे.एकंदर राज्य पातळीवरून भाजपाला शह देण्यासाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचे ठरवले खरे!मात्र सोनपेठ तालुक्यात प्रमुख नेत्यांच्या गावात निवडणुका होत असल्याने महाविकास आघाडीतीने ठरवलेल्या आणि रणनीतीला खो बसल्याचे चित्र यावरून स्पष्ट झाले आहे.यात तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या गावातील निवडणूका बिनविरोध पार न पडल्याने जिल्ह्यातील महाविकास आघाडीत दुरावा झाल्याचे बोलल्या जात आहे.यासोबतच खडका येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी-भाजपा सहयोगी पुरस्कृत पॅनल म्हणून निवडणुक पार पडत असल्याने तसेच निमगाव,शेळगाव, कान्हेगाव, धामोनी,बोदंरगाव,खपाट पिंपरी,गवळी पिंपरी,नरवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकातील समीकरणे येणाऱ्या काळासाठी महत्वाची ठरणार आहेत.यात तालुक्यातील कोरटेक,मोहळा,गंगापिंपरी,बुक्तरवाडी,पोंहडुळ या गावाची निवडणूक बिनविरोध पार पडल्याने प्रशासनाला सहकार्य लाभणार असल्याचे कळते.यासोबतच शेळगाव येथील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीसाठी राजकीय पक्षाचे वलय असणाऱ्या नेतृत्वासाठी येथील निवडणूक बिनविरोध न झाल्याने निवडणुकीत रंगत येणार असल्याचेही स्पष्ट होत आहे.कारण शेळगाव जिल्हा परिषद सर्कलसाठी हे गाव समीकरणे बदलणारे ठरले आहे.

COMMENTS