केज प्रतिनिधी. केज तालुक्यातील कुंबेफळ येथील 37 वर्ष बिनविरोध सरपंच राहिलेले व तालुक्यात नावलौकिक असलेले छत्रभुज रामभाऊ थोरात यांचे आज बुधवा...
केज प्रतिनिधी.
केज तालुक्यातील कुंबेफळ येथील 37 वर्ष बिनविरोध सरपंच राहिलेले व तालुक्यात नावलौकिक असलेले छत्रभुज रामभाऊ थोरात यांचे आज बुधवार रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांचे वय 88 वर्षाचे होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच तालुक्यात व परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांनी आपल्या 37 वर्ष सरपंच पदाच्या कार्यकाळात स्वर्गवाशी केशर काकू शिरसागर त्यांचे सुपुत्र जयदत्त अन्ना क्षीरसागर स्वर्गवासी विमलताई मुंदडा सह अनेक राजकीय लोकप्रतिनिधींकडून कुंबेफळ गावचा विकास करण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा व चार मुली आहेत. त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक सात जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे.

COMMENTS