प्रजासत्ताक दिन ..
प्रजासत्ताक आला
झेंडेबाजार फुलला
एवढे सुंदर ते झेंडे
प्रत्येकजण भुलला
कुणी लावे गाडीला
कुणी शर्टा साडीला
झेंडे हवेत सर्वांना
कुणा गच्चीमाडीला
भाव येई झेंड्याला
उमाळा देश प्रेमाला
झेंड्यासहीत सेल्फी
जो तो जुडे कामाला
जिकडे तिकडे झेंडे
बरे वाटते पहायला
हरेकजण आसुसला
देशभक्तीत नहायला
दुस-या दिवशी झेंडे
नको कुठे पडायला
झेंडे नाहीत कचरा
हवे डोळे उघडायला
2)
शहीद ..
शहीदांच्या यादीमध्ये
येणारं ती किती नावं
तिरंग्यात लपेटलेली
दिसणारं किती शव
वीर जाई जीवानिशी
हळहळतो देश गाव
किंकाळीने आसमंत
काळजाचा घेई ठाव
जवानांच्या पाठीमागे
कुटूंब सर्व सोसे घाव
सिमा वाद संपवा रे
जमिनीची किती हाव
आज हा हरे उद्या तो
लागे कुणाचा निभाव
मरणारी अंती माणसे
का गमवायची बेभाव
दोन्हीकडे नाचे मृत्यु
साधतोयं त्याचा डाव
नकाशा करून मोठा
साधणारं काय राव
3)
प्रजासत्ताक ..
हे प्रजासत्ताक दिनी
देशप्रेम ये उफाळून
दिवसजाई अस्तास
सारे जाई विरघळून
कागदी झेंडे शर्टाला
जा स्वतःवर भाळून
फोटो सेल्फी किती
पोष्ट पाठव खवळून
संचलना उभे ताठ
पाठदुखे कळवळून
कोण कोण आले ते
पाहतो मागे वळून
राष्ट्रगीताओठ हलते
शब्द जातात गळून
अर्थ काय असे तया
आले कधी रे कळून
घिसी पिटी भाषणे
करी अति कंटाळून
तीचंप्रथा तीचं कथा
चालणार ना टाळून
सोपस्कार सरता हे
नास्टा करी खवळून
पुढला दिवसअख्खा
काढतो मस्त लोळून
4)
राष्ट्रीयसण ..
प्रजासत्ताक दिवस
देश प्रेम येई दाटून
सायंकाळी उत्साह
लगेचं जाई आटून
कागदीझेंडे शर्टाला
लगेचं जाई फाटून
ध्वजारोहणाचालले
कसले नटून थटून
खादीची परीट घडी
जाते मग विस्कटून
हस्तांदोलन चालले
वरिष्ठ साहेबा भेटून
फोटो सेल्फी घेणार
त्यांना अगदी खेटून
राष्ट्र गीत पुटपुटतो
शब्द जातात गोठून
गीतचं नाही पाठ ते
अर्थकळणारं कुठून
साजरा करी उत्सव
मस्त मिठाई वाटून
राष्ट्रीयसण आपला
तयारी करी झटून
हक्काची आठवण
कर्तव्य देई झटकून
- हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६.
www.kavyakusum.com
सर

COMMENTS