महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, ‘बालभारती’, पुणे या संस्थेचा ५४ वा वर्धापन दिन बुधवार दिनांक २७ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता मा.ना.श्रीमती वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य तथा मा.अध्यक्ष, पाठ्यपुस्तक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणार आहे. यावेळी किशोर मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ होणार आहे. बालभारती नूतन वेबसाईट लोकार्पण, किशोर मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी लोगोचे अनावरण, '५० किशोर गोष्टी' या पुस्तकाचे प्रकाशन, किशोरच्या मोबाईल ऍपचे लौंचिंग असे विविध कार्यक्रम यावेळी पार पडणार आहेत.
सदर कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव हे उपस्थित राहणार आहेत. सोबत कार्यक्रम पत्रिका जोडली आहे. हा कार्यक्रम ई - बालभारतीच्या यु ट्यूब चॅनेलवरून आणि व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून लाईव्ह पाहता येणार आहे. सोबत कार्यक्रम पत्रिका आणि लाईव्ह कार्यक्रमाची लिंक जोडली आहे. कृपया आपण सहभागी व्हा आणि इतरांपर्यंत हा निरोप पोहचवा.
*वेळ*: बुधवार, दि. २७ जानेवारी २०२१ सकाळी : ११ वाजता
*स्थळ* : उत्तम सभागृह,बालभारती, सेनापती बापट मार्ग, पुणे
आपला
*दिनकर पाटील*
संचालक, बालभारती, पुणे

COMMENTS