सेवानिवृत्तीच्या काळामध्ये कोरोणापासून आपल्या तब्येतीची काळजी घ्या- आयजी तांबोळी


जिल्हा प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली

 जिल्हा वार्षिक तपासणी 2020-21 अंतर्गत नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी मंगळवारी हिंगोली जिल्ह्यातील औंढानागनाथ पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी केली. यावेळी तांबोळी यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधतांना सेवानिवृत्तीच्या उबंरठ्यावर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना मुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले. महाराष्ट्र पोलिस दलात एक शिस्तप्रीय, कर्तव्य कठोर म्हणुन ओळख असलेले आयजी तांबोळी यांची अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी असणार्या अपुलकिचे दर्शन झाले.

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी आज मंगळवार रोजी दुपारी चार वाजता औंढानागनाथ पोलिस ठाण्यामध्ये भेट दिली तांबोळी यांनी औंढा पोलीस ठाण्याच्या परिसराची पाहणी केली. औंढा ठाण्याची वार्षिक तपासणी केली. पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी औंढानागनाथ पोलीस ठाणे तसेच प्रलंबित गुन्हे, दप्तर तपासणी करुन औंढा पोलीस ठाण्याच्या परीसराची पाहणी केली. त्याप्रमाणे विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनाची तपासणी करून ही वाहने लिलावात काढण्याच्या सूचना दिल्या. पोलीस स्टेशन परिसराची पाहणी केली. पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, येत्या काळामध्ये कोण सेवानिवृत्त होणार आहे त्यांनी सेवानिवृत्तीच्या काळामध्ये कोरोणापासून आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची. असेही यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना म्हटले.तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या.यावेळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर ,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे , आदींची उपस्थिती होती

टिप्पण्या