माजलगाव/प्रतिनिधी
मानवी हक्क अभियान चे बीड जिल्हा अध्यक्ष राजेश घोडे यांना साप्ताहिक महाराष्ट्र मिडिया च्या वतीने राज्यस्तरिय" महाराष्ट्र समता गौरव " पुरस्कार जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार दिनांक 25 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी ७ वा. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री मा. ना. नवाब मलिक साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान पुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमांकाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार अँड. गणेशरावजी
दुधगावकर तर प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा खासदार प्रा. फौजिय खान तर प्रमुख पाहुणे म्हणून मान्यता. माजी. खा. अँड तुकाराम रेंगे पाटील, माजी खासदार अँड सुरेश जाधव, माजी विधान परिषद सदस्य रामराव वडकुते अदि मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी आयोजित करण्यात आला आहे

COMMENTS