सेलू:-( ) कै. श्रीरामजी भांगडीया यांच्या जयंतीनिमित्त दि. 23 जानेवारी रोजी कोरोना प्रादुर्भाव चे सर्व नियमांचे पालन करुन नूतन विद्यालय शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षिकांच्या बँडमिंटन क्रीडा स्पर्धाच्या उद्घाटनप्रसंगी, राजेंद्र पाल म्हणाले की शिक्षक/ शिक्षिका मैदानावर खेळायला येतात म्हणून विद्यार्थी तयार होतो. कोरोना प्रादुर्भाव पासून तंदुरुस्त व निरोगी राहण्यासाठी मैदानावर खेळणे गरजेचे आहे.
उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी प्रशालेचे उपमुख्याध्यापक रामकिशन मखमले, उद्घाटक उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल, नगराध्यक्ष विनोद बोराडे, प्रमुख उपस्थितीत उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे,पोलिस निरीक्षक माधव लोकुलवार, प्रा.अशोक पाठक, डॉ. सुबोध माकोडे, इजिं शिंदे,पर्यवेक्षक प्रा.नागेश कान्हेकर,आर.एन.सोन्नेकर, गिरीष लोडाया, गणेश माळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम चे प्रस्ताविक स्पर्धा संयोजक गणेश माळवे , तर सुत्रसंचालन प्रा.नागेश कान्हेकर आभार प्रदर्शन किशोर ढोके,यांनी मानले.
स्पर्धेत नूतन शिक्षण संस्थेतील पाच घटकतील 18 संघानी सहभाग नोंदवला, महिला गटात सौअर्चना कुलकर्णी : प्रथम, तर सुस्मिता भरदम : व्दितीय, सुषमा सोमाणी: तृतीय.मयुरी जैस्वाल: चौथा क्रमांक पटकावला.
पुरुष गटात दुहेरी क्रीडा स्पर्धेत प्रथम :- अतुल पाटील/ विशाल क्षिरसागर यांनी एक हजार रोख बक्षिस (प्रा.नागेश कान्हेकर यांच्या वतीने) तर व्दितीय बक्षिस:- निखिल झुटे/ किशोर ढोके ( यास सातशे रु रोख बक्षिस प्रा अशोक पाठक यांच्या वतीने) तर तृतीय बक्षीस :- सुनिल तोडकर/ व्यंकट तोरनाळे यास पाचशे रु रोख बक्षिस प्रा.महेश कुलकर्णी यांच्या वतीने देण्यात आले. सर्व विजेत्या दुहेरी संघास सन्मान चिन्ह इंद्रधनुष्य सेवाभावी संस्था वतीने देण्यात आले.
स्पर्धेस पंच म्हणून प्रा. महेश कुलकर्णी व सुरज शिंदे ,जितेंद्र घायतडक यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा संयोजक डी.डी.सोन्नेकर, सतिश नावाडे, विरेश कडगे, कुशल कडे, सचिदांन्नद डाखोरे, संतोष क्षिरसागर, सुनिल तोडकर,संभाजी रोडगे, गजानन मुळी, सुनिल राठोड, महेश हजारे, प्रसाद कांयदे, केशव डाहाळे, मंचक घायाळ, अरुण रामपुरकर, यांनी परीश्रम घेतले.



COMMENTS