माजलगाव/प्रतिनिधी
कोरोनाच्या महामारीमुळे आठवडी बाजार विस्कळीत झाला होता. ज्या वेळी लॉक डाऊन जसे शिथिल होत गेले तसे माळवे घेऊन बसणारे लोकं माळवे विकण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रं. 61 च्या कडेला केसापुरी कॅम्प ते ब्रह्मागाव पर्यंत येऊन बसत होते.
राष्ट्रीय महामार्गावर लोडिंग च्या गाड्या सतत चालू असतात आणि केसापुरी कॅम्प ते ब्राह्मगाव पर्यंत हा आठवडी बाजार भारत आहे. हा आठवडी बाजार भरत असल्याने जीवित हानी होण्यास नाकारता येत नाही म्हणून लोडिंगच्या वाहनांची गर्दी पाहून माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय जयराज भटकर यांच्या नेतृत्वाखाली आयटीआय कॉलेज च्या बाजूला जुन्या जागेत बसवण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी व होमगार्ड पो.कॉ. इंगोले, पो.कॉ. गडदे, पो.कॉ. चव्हाण,चालक श्रीमंत पवार आणि होमगार्ड यांच्या सहकार्याने राष्ट्रीय महामार्गावर भरणारा आठवडी बाजार आयटीआय कॉलेज केसापुरी कॅम्प येथील भरवण्यात आला आहे या पुढे ही आठवडी बाजार याच ठरल्या ठिकाणी भरणार असल्याचे पीएसआय जयराज भटकर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे.

COMMENTS