सोनपेठ/प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षाच्या पुरस्कृत पॅनलने गावपातळीवरील राजकारण ढवळून निघाले असतानाच पाथरी तालुक्यातील अटीतटीच्या विटा(बु.)ग्रामपंचायतवर शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाळासाहेब आरबाड यांच्या नेतृत्वाखाली ल परिवर्तन ग्रामविकास पँनलने विजयी झेंडा रोवला आहे.दोन तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या विटा(बु.)ग्रामपंचायतची लढत ही अटीतटीची झाली होती.यात शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाळासाहेब आरबाड यांनी सामान्य लोकांचे कामे मार्गी लावण्यासाठी मागील १० वर्षांपासून आपल्या राजकीय भवितव्याची बांधणी केली होती.यात केवळ शिवसेना या पक्षाचे उपतालुकाप्रमुख या पदाच्या बळावर त्यांनी गावासाठी वेगवेगळ्या योजना आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.यासोबतच त्यांनी लिंबा जिल्हा परिषद सर्कलमधील शेतकऱ्यांना पीककर्ज मिळवून देण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत समनव्य ठेवून बँक अधिकाऱ्यांची होणारी फजिती थांबवत अनेकांना कर्ज मिळवून देणे सुलभ केले आहे.या सर्व कार्यामुळे बाळासाहेब आरबाड यांची लोकप्रियता वाढून ग्रामपंचायत निवडणूकीत त्यांच्या ग्रामविकास परिवर्तन पँनलच्या नऊपैकी सात जागा अव्वल मताने निवडून आलेल्या आहेत.तर दोन जागा अवघ्या चार आठ मताच्या फरकाने हातच्या गेल्या आहेत.यात एकंदर मताचा आढावा घेतला असता असे दिसून येते की,विरोधी उमेदवारापेक्षा बाळासाहेब आरबाड यांना २०३ मते अधिकची मिळून तब्बल २०३ आरबाड विजयी झाले आहेत तर त्यांच्या ग्रामविकास परिवर्तन पँनलमधील इतर उमेदवारांनीही मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवत विजयी पताका फडकवली आहे.या विक्रमी विजयाने परभणीचे खा.संजय जाधव यांनी आरबाड यांचे अभिनंदन करत विटा(बु.)गाव विकासात्मक कार्यक्रम राबवण्यासाठी दत्तक घेतले आहे.

COMMENTS