नांदेड - सीटू संलग्न असंघटित कामगार संघटना व माजी सैनिक दिवंगत काशिनाथ जाधव प्रतिष्ठाण च्या संयुक्त वतीने नांदेड शहरातील महाराना प्रतापसिंह पुतळा गांधी नगर येथे भव्य सन्मान कार्यक्रम घेण्यात आला.
नांदेड जिल्ह्यातील प्रत्यक्षात कोविड - १९ काळात ज्यांनी जनसेवेचे कार्य केले त्यांचा सन्मान होणे अवश्यक होते. विविध संस्था व शासकीय स्तरावर अनेक कोरोना योध्दांचा गौरव करण्यात आला असून काही रस्त्यावरच्या गरजवंताना सहकार्य करणारे सन्माना पासून वंचितच होते. सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड आणि माजी सैनिक दिवंगत काशिनाथ जाधव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कॉ.रविंद्र जाधव यांच्या संकल्पनेतून कोरोना योध्दा सन्मान कार्यक्रम घेण्यात आला.
सदरील कार्यक्रमात १७० योध्यांना सन्मानित करण्यात आले असून त्या मध्ये लोक प्रशासन,पोलीस,वैद्यकिय,विधी,पत्रकारीता आणि सामाजिक व सेवाभावी संस्थांच्या प्रत्यक्षात कार्य केलेल्या मान्यवारांचा समावेश होता. प्रमुख पाहूणे म्हणून कॉ.विजय गाभणे,कॉ.ॲड.प्रदीप नागापूरकर,प्रा.सदाशिव भूयारे,कॉ.उज्वला पडलवार,कॉ.सुभाशिष कामेवार,प्रा.डॉ.लक्ष्मण शिंदे,प्रितपालसिंघ साहू,भारत खडसे,संजय गोटमुखे,भारत सरोदे,अहेमद बाबा बागवाले,गणेश मोरे,प्रा.ईरवंत सुर्यकार,प्रा.देविदास इंगळे,कॉ.संगिता गाभणे,पोलीस निरीक्षक अनंत नरूटे,सहाय्यक आयुक्त जगदिश कुलकर्णी,एबीपी माझाचे प्रतिनिधी धनंजय सोळंके,एमसीएनचे प्रमुख अंकुश सोनसळे,लोकमतचे उप संपादक भारत दाढेल,पत्रकार रमेश मस्के,कॉ.श्याम लाहोटी,दलित मित्र गणेश गुरूजी वाघमारे,एमपीजेचे अल्ताफ हुसेन, पदवीधर ग्रामसेवक संघटनेचे सचिव सुनिल पारडे,महेंद्र भटलाडे,साहेबराव गुंडिले,कॉ.बंटी वाघमारे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉ.मारोती केंद्रे,कॉ.सं.ना.राठोड,कॉ.मुकेश गर्दनमारे,कॉ.संतोष बोराळकर,कॉ.जयराज गायकवाड,कॉ.दतोपंत इंळे,कॉ.मगदूम पाशा,कॉ.सुभाषचंद्र गजभारे,कॉ.संतोष साठे,कॉ.अनुराधा परसोडे,कॉ.द्रोपदा पाटील,कॉ.मीरा बहादूरे,कॉ.लता गायकवाड यांनी प्रयत्न केले.

COMMENTS