सोनपेठ/प्रतिनिधी
तालुक्यातील विटा(बु.)येथील ग्रामपंचायत कार्यालयात सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम पार पडला.यावेळी गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना उपतालुकप्रमुख बाळासाहेब आरबाड यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही प्रकाश टाकत हजारो हात थकल्यानंतर एक हात कामी येतो तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवाराचा आणि तो हात कायम लोकांच्या सामान्यांच्या हितासाठी कार्यरत राहील अशी अशा व्यक्त केली.याप्रसंगी ग्रा.प.सदस्य उत्तम हारकाळ,भास्कर आरबाड, महादेव हारकाळ,दत्ता देंडगे, कल्याण मालसमिंदर,प्रकाश हारकाळ,यांच्यासह काशीनाथ आरबाड,बळीराम उबाळे, कारभारी दळवे,वसंत कांबळे,जयराम तूपसमिंदर,शरद आरबाड,अक्षय आरबाड,नामदेव लिंबोरे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उप
स्थिती होती.

COMMENTS