जिल्हा प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली जिल्हाचे लक्ष लागलेल्या शहरापासुन जवळच असलेल्या बळसोंड ग्राम पंचायत मध्ये नागरिकांनी जलक्रांती पँनलला एकहाती सत्ता देत तेराही उमेदवारांना निवडून दिले. निवडणुकीचा निकाल लागताच बळसोंड भागातील समस्या सोडविण्यासाठी जलक्रांती पँनल प्रमुख पप्पू चव्हाण यांनी सरपंच पदाची वाट न बघता नायक पिक्चर मधील हिरो सारखे आपल्या तेराही सदस्यांना सोबत घेऊन स्वखर्चाने कामाला सुरूवात केली आहे..
शहरापासून जवळच असलेल्या मात्र विकासा पासुन कोसो दुर असलेल्या बळसोंड च्या नागरिकांनी पप्पू चव्हाण यांच्या कार्यावर विश्वास टाकत त्यांच्या सर्व उमेदवारांना निवडून दिले या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता आणि सरपंच पदाची निवड होण्याची वाट ही न बघता नायक स्टाईल आपल्या कामाला सुरूवात केली आहे. पाच ही प्रभागातुन निवडून आलेल्या सदस्यांना वाँटसप ग्रुप तैयार करायला लाऊन त्या त्या भागातील नागरिकांना ग्रुपमध्ये जोडून त्या भागातील समस्या जाणुन घेत लाईट, पाणी, रस्ते असो या अन्य तात्काळ त्या सदस्याला मँसेज आल्यावर याची दखल घेऊन सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. तसेच लवकरच बळसोंड भागात चोरीचे प्रमाण थांबवण्यासाठी सर्व प्रभागात शहराला लाजवेल असे 120 सिसिटिव्ही कँमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती पप्पू चव्हाण यांनी दिली. तसेच पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रभागातील विहरींची स्वच्छता सुरू केली असुन स्वतः सर्व सदस्यांना घेऊन स्वखर्चाने कामाला सुरूवात केली आहे. अंतुले नगर परिसरात नाली चे पाणी विहीरीत जाऊन घाण तयार होत होती याची तात्काळ दखल घेत जेसीबी लाऊन नालीचे काम व रस्त्याचे काम सुरू केले. नायक स्टाईल कामाला सुरूवात केल्याने आता या परिसरातील नागरिक त्यांना बळसोंड च्या विकासाचा नायक असे संबोधू लागले. कुठलीही राजकिय पार्श्वभूमी नसताना, कुठलाही स्वार्थ न बाळगता फक्त समाज कार्याचा विडा उचलुन हा पप्पू चव्हाण नावाचा युवक राजकारणात सक्रीय झाला आहे. अशा समाजसेवकाला ग्लोबल मरावाडा न्युज चा सलाम


COMMENTS