राम दातीर
माहूर ( प्रतिनिधि )समस्त मानव जातीला काळीमा फासणा-या भोकर तालुक्यातील दिवशीच्या त्या दुर्दैवी घटनेचे माहूर शहरात पडसाद उमटले असून ते निर्घून कृत्य करणाऱ्या नराधामास त्वरित फासावर चढवा अशी मागणी माहूरकरांनी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांना दि.22 जाने.रोज शुक्रवारला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सदर घटनेचा निषेध करण्यासाठी माहूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यालया पर्यंत निघालेल्या निषेध मोर्चात माहूरचे योगी शामबापु भारती महाराज,माजी जि.प.सदस्या विमलताई खराटे, छायाताई राठोड, पद्मा गिऱ्हे, नगराध्यक्षा .शितल जाधव, रेणुका, दिशा, शेख फरजानाबी, शिवश्री बावणे, संगीता पोले, शेख हसीना, सुभद्रा तुंबवार, सौंदर्या माळकरी, मनोज किर्तने, निरधारी जाधव, गोपु महामुने, राजाराम गंदेवाड, विजय भगत, अशोक उपलवाड, नवनित देवपुलवार,प्रतीक कोपुलवार,संजय अन्नामवार,संजय बनसोडे,संतोष कमटेवाड, विनोद मार्गमवार, कैलास फड, हर्षदिप दिक्षीत यांचेसह अनेकांनी सहभाग घेतला होता.तहसीलदार वरणगांवकर यांनी शहरवासीयाचे निवेदन स्वीकारले.


COMMENTS