जिजाऊंचा आदर्श घेऊन महिलांनी संस्कार मूल्य रुजवावेत
.........तहसीलदार वैशाली पाटील
माजलगाव प्रतिनिधी
जिजाऊंनी संकटकाळात धेर्याने शिवाजी राजावर संस्कार मूल्य रुजवून युगप्रवर्तक निर्माण केला. जिजाऊंचा आदर्श महिलांनी घ्यावा असे प्रतिपादन तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले.
सुंदरराव सोळंके महाविद्यालय राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड भानुदासराव डक होते तर सत्यप्रकाश रुद्रवार,बाळासाहेब शिंदे, जकी बाबा, मराठी विभाग प्रमुख डॉ. एम. ए.कव्हळे, उपप्राचार्य प्रकाश गवते, उपप्राचार्य पवन शिंदे ,कार्यक्रमाधिकारी डॉ एस एन प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना तहसीलदार वैशाली पाटील म्हणाल्या की एक विचार आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. कार्यक्रमाचा समारोप अध्यक्षीय समारोप ऍड भानुदासराव डक यांनी केला.
कार्यक्रमाच्या सुरुवात श्रीमती मीना डक यांनी जिजाऊ वंदना गाऊन केली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.अर्चना कचरे यांनी केले तर सूत्रसंचलन वैशाली शहाणे यांनी केले.आभार प्रा.व्ही. आर. पुरी यांनी मानले.यावेळी राष्ट्रीय जिजाऊ सावित्री वारसदार पुरस्कार मिळाल्याबद्दल आरुणा स्वामी यांचा तहसीलदार हस्ते सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाला प्राध्यापक विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

COMMENTS