राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )अ.भा.गुरु रविदास समता परिषद या अराजकीय-सामाजिक संघटनेच्या माहूर तालुकाध्यक्षपदी अॅड.नितेश बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे.सामाजिक कामातूनच सतत समाज बांधवांना मदत करणारे,सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होऊन सर्वांना सोबत घेऊन समाजकार्यात आजपर्यंत अग्रेसर काम केली असून त्याची दखल घेत माहूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.अ.भा.गुरु रविदास समता परिषद चे संस्थापक अध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शना खाली सदर नियुक्ती करण्यात आली.
माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, कॉंग्रेस शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे,पं.स माजी सभापती वसंत कपाटे,अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष सरफराज दोसाणी,द पॉवर ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष विजय आमले,जयकुमार अडकिने,अॅड.श्याम गावंडे, विखे पाटील कृषी परिषदेचे ज्ञानेश्वर चौधरी,प्रा.प्रवीण बिरादार, अॅड. बिपीन पवार, प्रफुल जाधव, संजय बनसोडे,राजाराम गंदेवाड, सतीश भालके,राज ठाकूर, साजिद खान,गणेश चव्हाण, देवानंद कांबळे, जितेश जाधव,आनंदराव हिंगाडे, विश्वास पंडागळे,राम दातीर, राजू दराडे, संजय सोनटक्के,यांच्या सह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS