सोनपेठ/प्रतिनिधी
मागील अनेक वर्षांपासून दशनाम युवकांच्या हितासाठी व सामाजिक बांधिलकी जोपासून कार्यरत राहण्यासाठी दशनाम युवक प्रतिष्ठान परभणीच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन,समाज गौरव,वधुवर परिचय मेळाव्याचे करण्यात येते यावर्षी या कार्यक्रमाचे आयोजन आज १७जानेवारी रविवार रोजी परभणी शहरातील राजाराम सभागृहात सकाळी १० वाजता आयोजित केले आहे.मागील वर्षभरापासून दशनाम युवक प्रतिष्ठानने वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी कामगार यांचा गौरव,विद्यार्थी गुणगौरव,सँनीटाझर वाटप,कोरोना काळात गोरगरिबांना धान्य वाटप केले आहे.त्याअनुषंगाने यावर्षी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात कोरोना योद्धा म्हणून गौरव,तसेच समाजातील विशेष काम करणाऱ्या समाजबांधवाना समाजगौरव म्हणून गौरविण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून परभणीचे आ.डाँ.राहुल पाटील,अध्यक्ष म्हणून माजी आरोग्य संचालक डाँ.पी.एल.भारती,प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक राम भारती पिंपरखेडकर,संस्थापक शिववंशीय दशनाम गोसावी समाज शिवसंभा गोसावी,प्रसिध्द उद्योजक धर्मवीर भारती,कार्याध्यक्ष शिववंशीय दशनाम गोसावी समाजाचे सूर्यकांत गिरी गोसावी,धनराज गिरी,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश बन,दशनाम गोसावी समाज युवाध्यक्ष राजू भारती,अँड.उमाकांत गिरी औरंगाबादकर तर प्रमुख वक्ते म्हणून निश्चल पुरी फाउंडेशनचे अविनाश भारती,ह.भ.प.माऊली महाराज खडकवाडीकर, गोसावी युवक प्रतिष्ठान लातूरचे अनिल पुरी,गिरी केमिस्ट्री क्लासेस नांदेडचे प्रा.संतोष गिरी हे असणार आहेत.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वप्नील(भैय्या)भारती, संदीप गिरी कान्हेगावकर,शाम गिरी,सुरेश पुरी यांच्यासह दशनाम युवक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS