केज दि २३(प्रतिनिधी) शहरातील सरस्वती महाविद्यालय व भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना सांस्कृतिक विभाग आयोजित नेताजी ...
केज दि २३(प्रतिनिधी)
शहरातील सरस्वती महाविद्यालय व भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना सांस्कृतिक विभाग आयोजित नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ जी बी पाटील,प्रमुख उपस्थिती प्राचार्य एच बी सौदागर, प्रा एच ए शिंदे
आदींची होती
यावेळी क्रांतिकारी चळवळीत आझाद हिंद सेना स्थापन करून स्वतंत्र संग्रामात मोठे योगदान दिले असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.
बोस यांची तरुणांनी प्रेरणा घेऊन कार्य केले असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा डॉ जे के जाधव यांनी तर आभार प्रा डॉ आरडले यांनी केले . प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

COMMENTS