२ लाख ५८ हजार रूपायांच्या मुद्देमालासह ३२ आरोपींवर कारवाई
जिल्हा प्रतिनिधी - महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली जिल्हात मागील काही दिवसांपासून अवैध धंदे बोकाळले असुन नांदेड परिक्षत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या आदेशाला ठाणेदारांकडून केराची टोपली दाखवण्यात येत असल्याचे आयपीएस यतीश देशमुख यांच्या कारवाईतुन समोर आले आहे. आयपीएस यतीश देशमुख यांनी तीन दिवसात शहर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका बुकी व जुगार अड्यांवर छापे टाकत २ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त करत ३२ आरोपीं विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई ने जिल्हयात खळबळ उडाली आहे. आयजींच्या वार्षीक तपासणी दौरा निमित्ताने ठाणेदारांकडून ठाणे स्वच्छ व सुंदर करण्यात आले होते. मात्र ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची घाण ठाणेदारांकडून स्वच्छ झाली नाही. ज्याच्या तक्रारी नांदेड चे डिआयजी निसार तांबोळी यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी स्वत: हिंगोली ग्रामीण व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार व मटक्यावर कारवाई केली. नांदेड परिक्षत्राला लाभलेले कर्तव्यदक्ष डिआयजी तांबोळी यांनी नांदेड परिक्षेत्राचा पदभार स्विकारल्यानंतर परिक्षेत्राअंतर्गत येणार्या जिल्हयात अवैध धंदे खपवुन घेणार नसल्याचा ईशारा जिला पोलिस प्रमुखांना दिला होता. मात्र त्यांच्या आदेशाला हिंगोली जिल्ह्यात केराची टोपली दाखवत काही ठाणेदारांकडून अवैध धंद्यांना खतपानी घातल्या जात आहे. ज्याची माहिती डिआयजी निसार तांबोळी यांच्या कानावर पडताच आयपीएस यतीश देशमुख यांच्या पथकाने जिल्हयात कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरात सुरू असलेल्या मटका बुक्कींवर त्यांनी कारवाई केली. ज्यामध्ये हनुमान नगर, पत्रकार भवन जवळील मोकळया जागेत, मच्छीमार्केट, मस्तानशहा नगर, आदी ठिकाणी मटका बुक्कींवर कारवाई करण्यात आली यामुळे शहरातील अवैध धंद्यावर कारवाई करण्या करीता शहर पोलिस ठाण्यात डिबी पथकाची स्थापना करण्यात आली असून डिबी चे पथक फक्त नावालाच असल्याचे दिसून येत आहे. तर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिंगोली नांदेड मार्गावर राजदरबार बिअर बार च्या पाठी मागे मोठा जुगार अड्डा चालत असल्याची गुप्त माहिती आयपीएस यतीश देशमुख यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथका मार्फत छापा टाकुन ११ आरोपींना ताब्यात घेउन त्यांच्या कडून पावने दोन लाख रूपायांचा मुद्देमाल जप्त केला. ऐवढा मोठा जुगार अड्डा ठाण्याच्या हद्दीत चालत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना नव्हती का? असाही प्रश्न निर्माण होत आहे. या आधीही काही वर्षांपूर्वी याच परिसरात पोलिस महासंचालक मुंबई यांच्या पथकाने जुगार अड्यावर मोठी कारवाई केली होती ज्यामध्ये पोलिस कर्मचारी ही जुगार खेळताना सापडले होते. सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी दोन दिवसातच मटका व जुगारावर कारवाई करीत ३२ आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांच्या कडून २ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आता अवैध धंद्यांना खतपानी घालणार्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर नांदेड परिक्षत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी काय कारवाई करतात याकडे जिल्हा वाशियांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS