मुख्यमंत्र्यांना पाठविले ईमेल
धर्माबाद (अहमद लड्डा) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धर्माबाद तालुका अध्यक्ष श्री दत्तात्रय धोंडीबा कावडे यांनी मुख्यमंत्र्यांना ईमेल द्वारे पत्र पाठविले आहे की कोरोनाच्या जागतिक साथीच्या निमित्ताने ग्रामसभा बंद करण्यात आल्या.पण है ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या विकासाचे केंद्रबिंदू होते. ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगाचा शेवटचा निधी कोविडच्या उपकरणांसाठी असेल. असे जीआर ग्रामविकास मंत्री यांच्याकडून प्रारित करण्यात आले होते. येथे कोणत्या प्रकारची उपचारात्मक योजना केली गेली आहे आणि या निधीतून गावाला किती व कोणती सुविधा देण्यात आली की नाही हे देखील स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे आणि पुढील विकासासाठी ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. नवीन सरपंच नेमण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी ग्रामसभा घेण्याचे आदेश देण्यात यावेत, या संदर्भात मनसे कडून ईमेल पाठविण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटामध्ये निवडणूक सभेला परवानगी दिली जाऊ शकते, ज्यात हजारो लोक उपस्थित असतात आणि ग्रामसभेच्या विकासामध्ये कमी लोक असूनही त्यांना परवानगी मिळत नाही. असे पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धर्माबाद तालुका अध्यक्ष दत्तात्रय कावड़े यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे. या ईमेल ची दखल पुढील कार्यवाहीसाठी ते ग्रामविकास विभागाकडे पाठविले असून लवकरच ग्रामसभेला परवानगी मिळेल अशी अपेक्षा वर्तविलीआहे.

COMMENTS