पत्रकरीता हा समाजाचा आरसा असतो. सामजिक चळवळीतील वास्तव अनुभव घेऊन समाजातील अडी अडचणी वृत्तपत्रांच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करणारे श्री.विश्व्ंभर संभाजी वन्ने यांचा आज वाढदिवस त्याबद्दल त्यांचा थोडक्यात परिचय देणारा हा लेख...
श्री. विश्व्ंभर संभाजी वन्ने यांचा जन्म दि. 1 फेब्रुवारी 1974 रोजी नायगाव ता. नायगाव जि.नांदेड़ येथे एका गरीब कुटुंबात झाला.घरची परिस्थिती अतिशय हालाखिची.अशाही परिस्थितीत त्यानी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जि.प.के .प्रा.शाळा नायगाव ,माध्यमीक व उच्च माध्यमीक शिक्षण जनता हायस्कूल क. महाविद्यालय नायगाव ,पदवीचे शिक्षण शरदचंद्र महाविद्यालय नायगाव येथे झाले.शिक्षण घेताना आलेले अनुभव व समाजातील लोकांची होणारी परवड पाहून त्यानी पत्रकार व सामाजिक चळवळीच्या माध्यमातून लोकाना न्याय देता येइल म्हणून पत्रकारिता व सामाजिक कार्य सुरु केले.सुरुवातीला दै.समता दर्पण या वृत पत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर रिपब्लिकन गार्ड,महासागर ,समीक्षा ,वाचकमंच ,शिल्पकार अशा वृत पत्रातून काम केले.श्री.विश्व्ंभर वन्ने यानी रिपाई आठवले गट नायगाव तालुका अध्यक्ष,रिपब्लिकन सेनेचा तालुका प्रमुख व सरचिटणीस,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व मराठीच पत्रकार संघाचे सदस्य अशा पदावर राहून कार्य केले.गोरगरिबांना न्याय मिळून देण्यासाठी त्यानी अंदोलन,मोर्चाचा मार्ग अवलंबला.बरबडा येथील गायरान जमिनी बौध्द समाजातील लोकांच्या नावावर करुन द्याव्यात यासाठी दशरथ लोहबन्दे यांच्या नेतृत्वाखाली नायगाव तहसिलवर मोर्चा काढला.शासनाच्या मालकीचे असलेले गौण खनिज चोरी जाऊ नये यासाठी निदर्शने केली.सा.बा. विभाग नायगाव पूढे निकृष्ट केलेल्या कामाची चौकशी व्हावी यासाठी आमरण उपोषण केले.नायगाव सह परिसरातील अवैध बंद करण्यासाठी अंदोलन केले .घरकुल लाभ धारकाला मोफत रेती देण्यासाठी नायगाव तहसिल समोर निदर्शन केले.जीवनात गौतम बुद्ध,म.फुले,आंबेडकर,शाहू याना आदर्श मानणारे श्री.
विश्व्ंभर संभाजी वन्ने याना भविष्यात सामाजिक चळवळीत कार्य करायचे आहे.त्याना वाढदिवसानिमित शुभेच्छा देऊया!
शंकर बोइनवाड
संपादक
शालेय संकल्प
उदगीर,जि.लातूर

COMMENTS