नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
तालुक्यातील मौजे खंडगाव येथील माजी सरपंच तथा चेअरमन व सामाजिक कार्यकर्ते शंकरराव ग्यानोबा घंटेवाड यांचे दिनांक 21 जानेवारी रोजी वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, नातू असा मोठा परिवार आहे.
शंकरराव घंटेवाड यांच्यावर अंत्यसंस्कार दिनांक 22 जानेवारी रोजी त्यांच्या शेतामध्ये करण्यात आलेल्या वेळी लसाकमचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र भालेराव यांनी सविस्तरपणे त्यांच्या कार्याला उजाळा दिला तर गावचे सरपंच सुरेश पाटील कदम, तुकाराम गोरे, गंगाधर कोतेवार, उत्तम इंगळे, यांनी आपल्या भावना शोकसभेत व्यक्त केल्या आहेत, यावेळी माजी आ.वसंतराव पाटील चव्हाण. प्रथम नगराध्यक्षाचे प्रतिनिधी पंढरी भालेराव.
विठ्ठल भालेराव, रणजित बैलकवाड, पत्रकार माधव बैलकवाड,सि.डी.कांबळे यासह महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात अंत्यविधीला उपस्थिती होती.

COMMENTS